आता मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा...! गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 08:11 PM2023-12-20T20:11:04+5:302023-12-20T20:11:43+5:30

Revised Criminal Law Bills: लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मॉब लिंचिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि आम्ही या कायद्यात मॉब लिंचिंग गुन्हासाठी फांशीच्या शिक्षेची तरतूद  करत आहोत.

Now death penalty for mob lynching Information of Home Minister Amit Shah in Lok Sabha | आता मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा...! गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत माहिती

आता मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा...! गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत माहिती

Revised Criminal Law Bills ( Marathi News ) लोकसभेत बुधवारी तीन नव्या फौजदारी कायदा विधेयकांसंदर्भात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भारतीय नागरी संरक्षण संहितेत (CRPC) पूर्वी 484 कलमे होती, आता 531 असतील. 9 नवी कलमे जोडण्यात आली आहेत. तर 39 नवे सबसेक्शन जोडण्यात आले आहेत. 

अमित शाह म्हणाले, सीआरपीसीच्या 177 कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे. 44 नव्या तरतुदी आणि स्पष्टीकरणे जोडण्यात आली आहेत. याशिवाय 35 सेक्शन्समध्ये कालमर्यादा जोडण्यात आली असून 14 कलमे काढण्यात आली आहेत.

मॉब लिंचिंगच्या गुन्ह्यात होईल फाशीची शिक्षा -
लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मॉब लिंचिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि आम्ही या कायद्यात मॉब लिंचिंग गुन्हासाठी फांशीच्या शिक्षेची तरतूद  करत आहोत. मात्र मला विरोधकांना विचारायचे आहे की, आपणही (काँग्रेस) अनेक वर्षे देशात सरकार चालवले. आपण मॉब लिंचिंग विरोधात कायदा का आणला नाही? आपण मॉब लिंचिंग शब्दाचा वापर केवळ आम्हाला अपशब्द बोलण्यासाठी केला. मात्र सत्तेवर असताना कायदा करायला विसरले.

सभागृहाला माहिती देताना शाह म्हणाले, सीआरपीसीच्या जागी, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 या सभागृहाच्या स्वीकृतीनंतर आमलात येईल. याशिवाय, भारतीय पुरावा कायदा (एव्हिडन्स अॅक्ट 1872) च्या जागी आता भारतीय पुरावा विधेयक 2023 लागू होईल.

Web Title: Now death penalty for mob lynching Information of Home Minister Amit Shah in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.