(निनाद) समाजाभिमुख उपक्रम राबविणार

By Admin | Published: August 31, 2015 12:24 AM2015-08-31T00:24:33+5:302015-08-31T00:24:33+5:30

ताकवले : आचार्य अत्रे शिक्षक-शिक्षकेतर कमर्चारी पतसंस्थेची सभा उत्साहात

(Ninaad) will undertake social oriented activities | (निनाद) समाजाभिमुख उपक्रम राबविणार

(निनाद) समाजाभिमुख उपक्रम राबविणार

googlenewsNext
कवले : आचार्य अत्रे शिक्षक-शिक्षकेतर कमर्चारी पतसंस्थेची सभा उत्साहात
सासवड : आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व संपूर्ण जगात अजरामर आहे आणि त्यांचे नाव अजरामर राहण्यासाठी या नावाने चालविण्यात येणार्‍या सर्व संस्था चांगल्या पद्धतीने चालविण्यात येत आहेत आणि हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आचार्य अत्रे कर्मचारी पतसंस्थेच्या माध्यमातून केवळ आर्थिक कारभारावर भर न देता सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येईल,' असे प्रतिपादन आचार्य अत्रे पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे शिक्षक शिक्षकेतर कमर्चारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी शांताराम पोमण, कुंडलिक मेमाणे, आत्माराम शिंदे, सुधाकर जगदाळे, शिवाजी घोगरे, नंदकुमार सागर, भगवंत बेंद्रे, रामदास जगताप, बिभीषण जाधव, दिलीप नेवसे, रामदास शिंदे, बाळासाहेब मुळीक, नितीन राऊत, सुनील जगताप, दिलीप पापळ, चंद्रकांत फुले, प्रशांत कदम, चौदार पोपट, सुरेश देशपांडे, सुषमा दरेकर, दीपाली दळवी, तानाजी झेंडे, बळवंत गरुड तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
०००००

Web Title: (Ninaad) will undertake social oriented activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.