नागवडे व कुकडी कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही---- जोड

By admin | Published: April 18, 2015 01:43 AM2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30

किसान क्रांती मंडळाचे नेते शिवाजीराव नागवडे म्हणाले की, डहाणूकराला पिटाळून लावून शेतकर्‍यांच्या मालकीचा सहकारी कारखाना उभा केला, परंतु आमच्यावर खोटेनाटे आरोप करून टिंगल टवाळी केली जात आहे. लबाड बोलणारांना विधानसभेत धडा शिकविला. आता कारखाना निवडणुकीतही सभासद त्यांना स्वीकारणार नाहीत.

Navegade and Cucumber factory will not be changed ---- | नागवडे व कुकडी कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही---- जोड

नागवडे व कुकडी कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही---- जोड

Next
सान क्रांती मंडळाचे नेते शिवाजीराव नागवडे म्हणाले की, डहाणूकराला पिटाळून लावून शेतकर्‍यांच्या मालकीचा सहकारी कारखाना उभा केला, परंतु आमच्यावर खोटेनाटे आरोप करून टिंगल टवाळी केली जात आहे. लबाड बोलणारांना विधानसभेत धडा शिकविला. आता कारखाना निवडणुकीतही सभासद त्यांना स्वीकारणार नाहीत.
राहुल जगताप म्हणाले की, पाणी सोडू नये म्हणून पाचपुतेंनी मंत्र्यांचे कान भरले, मात्र दि. १ मेपासून कुकडीचे आवर्तन सोडणार, घोडचे शेतकर्‍यांच्या मागणीनुसार केव्हाही आवर्तन सोडू थेंबभर पाण्यासाठी कुणाला त्रास होऊ देणार नाही.
अण्णासाहेब शेलार म्हणाले की, मी साईकृपाला नव्हे तर अंबालिकाला ऊस घातला होता. अंबालिका कारखाना बंद पडल्याने साईकृपाला ऊस गेला. राजकारणात उतरती कळा लागली म्हणून आमच्यावर टीका केली जात आहे.
बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, दोन्ही कारखान्यात सत्ता परिवर्तन होणार नाही. मात्र आ.जगताप यांनी पाणी प्रश्नात लक्ष घालावे. यावेळी प्रा.तुकाराम दरेकर, अरुण पाचपुते, शिवाजी पाचपुते यांची भाषणे झाली. आभार राजेंद्र नागवडेंनी मानले.

Web Title: Navegade and Cucumber factory will not be changed ----

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.