Jind By-Election : हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 09:29 AM2019-01-28T09:29:15+5:302019-01-28T12:41:17+5:30

हरियाणा येथील विधानसभेच्या जिंद पोटनिवडणुकीसाठी आज (28 जानेवारी) मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

Key Haryana Bypoll Today A Test For BJP Ahead Of Lok Sabha Elections | Jind By-Election : हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

Jind By-Election : हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

Next
ठळक मुद्दे हरियाणा येथील विधानसभेच्या जिंद पोटनिवडणुकीसाठी आज (28 जानेवारी) मतदान होत आहे. 21 उमेदवार ही निवडणूक लढवित असून यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचाही समावेश आहे. आज 1 लाख 70 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

चंदीगड : हरियाणा येथील विधानसभेच्या जिंद पोटनिवडणुकीसाठी आज (28 जानेवारी) मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 21 उमेदवार ही निवडणूक लढवित असून यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचाही समावेश आहे. जिंदमध्ये एकच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मात देतील काय? खट्टर यांनी जिंद पोटनिवडणुकीत आपल्या पसंतीचे उमेदवार डॉ. कृष्ण मिडढा यांना भाजपाचे तिकीट दिले आहे.

डॉ. कृष्ण मिडढा यांचे वडील डॉ. हरिचंद मिडढा इंडियन नॅशनल लोकदलाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. जिंद येथून दोनदा आमदार राहिलेले डॉ. हरिचंद मिडढा यांचे पुत्र डॉ. कृष्ण मिडढा यांना खट्टर यांनी इंडियन नॅशनल लोकदलापासून वेगळे करीत भाजपामध्ये सहभागी करून घेतले. तसेच, त्यांना पोटनिवडणुकीची उमेदवारीही दिली. खट्टर यांना विश्वास आहे की, ज्या प्रकारे भाजपाने काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच महापालिका निवडणुकीत महापौरांच्या सर्व जागा जिंकल्या त्याचप्रमाणे जिंद पोटनिवडणूकही जिंकता येईल. काँग्रेस नेतृत्व या जागेवर विजय मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. 



काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी सकाळी सोमनाथ मंदिरात जाऊन प्रार्थना केली आहे. आज 1 लाख 70 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी 174 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. 31 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.  काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली असल्यामुळे हरियाणातील पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.  






 

 

Web Title: Key Haryana Bypoll Today A Test For BJP Ahead Of Lok Sabha Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.