झारखंड: सूनबाईंनीही सोडले, सासऱ्याची वाट बिकट; हेमंत सोरेन यांच्या अडचणी संपेनात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 06:59 AM2024-03-22T06:59:08+5:302024-03-22T07:00:26+5:30

आमदार सीता सोरेन यांनी ‘झामुमो’शी काडीमोड घेत केला भाजपात प्रवेश

Jharkhand Sita Soren joins BJP now Hemant Soren in trouble for Lok Sabha Election 2024 | झारखंड: सूनबाईंनीही सोडले, सासऱ्याची वाट बिकट; हेमंत सोरेन यांच्या अडचणी संपेनात!

झारखंड: सूनबाईंनीही सोडले, सासऱ्याची वाट बिकट; हेमंत सोरेन यांच्या अडचणी संपेनात!

झारखंड निवडणूक वार्तापत्र: किरण अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, रांची: झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना ईडीने केलेली अटक व त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याने विधानसभेतील नेतृत्व बदल यामुळे राजकारण तापू शकते. अशातच ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांच्या मोठ्या सूनबाई, हेमंत सोरेन यांच्या वहिनी आमदार सीता सोरेन यांनी ‘झामुमो’शी काडीमोड घेत भाजपात प्रवेश केल्याने सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याच्या कथित आरोपात अटक झाल्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून विश्वासमत जिंकले. त्यामुळे झामुमो व काँग्रेस महाआघाडीत त्वेष दिसतो. याचाच भाग म्हणून भाजपातून टीएमसीत आलेल्या यशवंत सिन्हांना महाआघाडीचे उमेदवार बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सीता सोरेन व काँग्रेसचे मारुती नंदन सोनी भाजपात आल्याने महाआघाडीला धक्का 
बसला आहे.

बंडामागे मुंबई कनेक्शन

  • हेमंत यांच्या अटकेनंतर पत्नी कल्पनांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते, तेव्हाच सीता सोरेन यांची नाराजी समोर आली. 
  • त्यामुळेच मुख्यमंत्रिपदाची माळ चंपाई सोरेन यांच्या गळ्यात टाकावी लागली. चंपई यांच्या मंत्रिमंडळात सीता यांना मंत्रिपदाचा शब्द मिळाला होता. 
  • पण तो न पाळता हेमंत यांचे भाऊ वसंत मंत्री झाले. तसेच मुंबईतील महाआघाडीच्या सभेतही कल्पना यांनाच ‘लाँच’ केल्याने मोठ्या सूनबाई सीता यांनी बंड केले.
  • चार टप्प्यात मतदान : १३, २०, 
  • २५ मे व १० जून
  • मतदार : २,५५,१८,६४२


२०१९ मधील निकाल - जागा १४ - १ काँग्रेस समर्थित झामुमो, १ काँग्रेस, १भाजप समर्थित आजसु, ११ भाजप

Web Title: Jharkhand Sita Soren joins BJP now Hemant Soren in trouble for Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.