वाळवंटात भारतीय जवानांना मिळणार आता ‘एसी जॅकेट’

By admin | Published: April 25, 2015 01:32 AM2015-04-25T01:32:08+5:302015-04-25T01:32:08+5:30

वाळवंटात कमालीच्या उष्णतेत काम करणाऱ्या भारतीय जवानांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटना डीआरडीओने वातानुकूलित अंतर्वस्त्रे व जाकिटे तयार केली

Indian jawans to get 'AC jacket' in desert | वाळवंटात भारतीय जवानांना मिळणार आता ‘एसी जॅकेट’

वाळवंटात भारतीय जवानांना मिळणार आता ‘एसी जॅकेट’

Next

नवी दिल्ली : वाळवंटात कमालीच्या उष्णतेत काम करणाऱ्या भारतीय जवानांसाठी संरक्षण संशोधन व विकास संघटना डीआरडीओने वातानुकूलित अंतर्वस्त्रे व जाकिटे तयार केली असून, प्रयोगशाळेत त्यांची चाचणीही पूर्ण झाली आहे. शरीरावर धारण करता येणारी व कोठेही घेऊन जाता येणारी ही वातानुकूलित यंत्रणा वाळवंटात वापरण्यासाठी असून डीआरडीओच्या प्रयोगशाळाचे हे संशोधन आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.
या अंतर्वस्त्राच्या साहाय्याने असह्य अशा उष्णतेचा त्रास बराच कमी होणार आहे. या शीत जॅकिटामुळे उष्णता १० ते १५ अंश सेल्सिअस इतकी कमी होऊ शकते. अमेरिकन लष्कराने अफगाणिस्तानात तैनात करण्यात आलेल्या जवानांसाठी अशी शीत अंतर्वस्त्रे वापरली होती; पण भारतीय जवानांसाठी प्रथमच देशी बनावटीची ही शीत जॅकिटे तयार करण्यात आली असून, ती सैनिक व निमलष्करी जवान दोघांनाही वापरता येणार आहेत. डीआयपीएसच्या हिट फिजिआॅलॉजी (शरीरशास्त्र) गटाने ही जॅकिटे तयार केली आहेत. ही अंतर्वस्त्रे व जाकिटे पेल्टिअर परिणामाच्या तत्त्वावर काम करतात. त्याअंतर्गत इलेक्ट्रिक सर्किटच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह टर्मिनलचे तापमान वेगवेगळे असते. निगेटिव्ह बाजू थंड असेल तर तिच्या संपर्कात येणारी वस्तूही थंड होते. हे तंत्र वापरून जॅकिटातील पोकळ नळ्यांत निगेटिव्ह बाजूने हवा भरली जाते. त्यामुळे आतील हवाही थंड होते. काळ्या रंगाच्या या सच्छिद्र जॅकिटातील नळ्या त्वचेला थंड करतात.

 

Web Title: Indian jawans to get 'AC jacket' in desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.