आई-वडिलांची देखभाल न केल्यास पगारात १० टक्के कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 03:49 AM2018-07-28T03:49:01+5:302018-07-28T03:50:13+5:30

वेतनातून पैसे कपात करून ते पैसे आई-वडिलांच्या खात्यात टाकले जाणार

If you do not take care of your parents, pay 10 percent of the salary | आई-वडिलांची देखभाल न केल्यास पगारात १० टक्के कपात

आई-वडिलांची देखभाल न केल्यास पगारात १० टक्के कपात

Next
<p>गुवाहाटी : आसाममधील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक कायदा केला आहे. जर या कर्मचाºयांनी आपल्या आई-वडिलांची देखभाल केली नाही, तर त्या कर्मचाºयांच्या वेतनातून पैसे कपात करून ते पैसे आई-वडिलांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. अर्थमंत्री हेमंत विश्व सरमा यांनी ही माहिती दिली. अशाप्रकारे कायदा करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य
असणार आहे.
अर्थमंत्री सरमा म्हणाले की, या नियमांतर्गत जर एखाद्या सरकारी कर्मचाºयाने त्याच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांची देखभाल केली नाही, तर त्याच्या एकूण वेतनातील १० टक्के रक्कम कपात केली जाईल आणि ही रक्कम आई-वडिलांच्या खात्यात टाकण्यात येईल. दिव्यांग भाऊ, बहीणीकडे दुर्लक्ष करणाºयांच्या वेतनातून १५ टक्क्यांपर्यंत रक्कम कपात करण्यात येईल.
ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने या आठवड्याच्या सुरुवातीला याबाबतच्या नियमांना मंजुरी दिली आहे. आम्ही आता प्रणाम आयोगाची स्थापना करणार आहोत. यात अधिकारी नियुक्त करण्यात येतील. २ आॅक्टोबरपासून
प्रणाम अधिनियम लागू करण्यात येईल. आई-वडिलांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी मागील वर्षी विधानसभेत प्रणाम विधेयक मंजूर करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: If you do not take care of your parents, pay 10 percent of the salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.