मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:09 PM2024-02-07T15:09:38+5:302024-02-07T15:11:08+5:30

जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

I don't like reservations, certainly not in jobs; PM Narendra Modi read Pandit Nehru's letter in Rajya Sabha | मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

मला आरक्षण आवडत नाही, नोकरीत तर अजिबातच नको; PM मोदींनी वाचलं नेहरुंचं पत्र

नवी दिल्ली - Narendra Modi on Congress ( Marathi News ) काँग्रेस सध्या जाती आरक्षणावर बोलत आहे. परंतु काँग्रेसनं स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी यांना काँग्रेसचा जन्मजात विरोध आहे. हा विचार आताचा नाही तर आधीपासून आहे. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते, त्यात आरक्षण मला आवडत नाही. विशेषत: नोकरीत आरक्षण मिळायलाच नको, या पत्राचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यसभेत पंतप्रधान मोदी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलत होते. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात पहिल्यांदा NDA सरकारनं आदिवासी लेकीला राष्ट्रपतीपदाचं उमेदवार बनवलं. आमच्यासोबत तुमचे वैचारिक विरोध असतील परंतु एका आदिवासी समाजातील महिलेला इतक्या मोठ्या पदावर बसवलं जात होतं म्हणून काँग्रेसनं विरोध केला. जबाबदार नेत्यांकडून राष्ट्रपतींचा अपमान केला जातोय. जो मनात द्वेष आहे तो बाहेर काढला जातो. समाजातील वंचित घटकांबाबत नेहमीच काँग्रेसच्या मनात राग आहे. गेली ७० वर्ष काँग्रेसनं जम्मू काश्मीरातील SC, ST आणि OBC यांना आरक्षणापासून वंचित ठेवले. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर SC, ST यांना आरक्षणच मिळाले नसते असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही जितके काम केले आहे ते समाजातील एसटी, एससी आणि ओबीसी घटकांसाठी आहे. त्यांना पक्के घर मिळाले. अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगराईपासून मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवले. चुलीतील धुरामुळे होणाऱ्या त्रासापासून महिलांना मुक्त केले. उज्ज्वला योजना आणली. मोफत गॅस, मोफत रेशन यातील लाभार्थी याच घटकातील लोक आहेत. काँग्रेसनं आधीपासून आरक्षणाला विरोध केला. जर एससी, एसटी आणि ओबीसी यांना आरक्षण मिळाले तर सरकारी कामकाजाचा स्तर घसरेल असं नेहरूंनी पत्रात म्हटलं होते असा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. 

दरम्यान, सीताराम केसरी हे अतिमागास वर्गीय जातीतून येत होते. ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. परंतु त्यांना उचलून फुटपाथवर फेकून दिले. हा व्हिडिओ देशाने पाहिला. यांचे मार्गदर्शक अमेरिकेत बसले आहेत. मागील निवडणुकीत हुआ तो हुआ यासाठी ते फेमस झाले होते. काँग्रेस या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. काँग्रेसनं संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कमी करण्याचा खूप प्रयत्न केले. आंबेडकरांना काँग्रेसनं भारतरत्नही दिला नाही. ज्या काँग्रेसला त्यांच्या नेत्यांवर गॅरंटी नाही, पक्षाच्या धोरणांवर गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायेत अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली. 

Web Title: I don't like reservations, certainly not in jobs; PM Narendra Modi read Pandit Nehru's letter in Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.