होळीच्या बहाण्याने स्पर्मने भरलेला फुगा मुलाने फेकून मारला, विद्यार्थीनीने सांगितला किळसवाणा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 10:38 AM2018-02-28T10:38:25+5:302018-02-28T13:39:02+5:30

होळीच्या बहाण्याने मुलं फुग्यांमध्ये स्पर्म भरून आम्हाला फेकून मारतात, असं या विद्यार्थीनीने सांगितलं आहे.

Harassment during Holi: Students of a Delhi college believe balloons with semen were thrown at them | होळीच्या बहाण्याने स्पर्मने भरलेला फुगा मुलाने फेकून मारला, विद्यार्थीनीने सांगितला किळसवाणा प्रकार

होळीच्या बहाण्याने स्पर्मने भरलेला फुगा मुलाने फेकून मारला, विद्यार्थीनीने सांगितला किळसवाणा प्रकार

Next

नवी दिल्ली-  दिल्ली विद्यापीठाचं प्रसिद्ध लेडी श्री राम कॉलेजमधील एका विद्यार्थीने अत्यंत किळसवाणा प्रकार सांगितला आहे. होळीच्या बहाण्याने मुलं फुग्यांमध्ये स्पर्म भरून आम्हाला फेकून मारतात, असं या विद्यार्थीनीने सांगितलं आहे. ग्रेज्युएशनच्या पहिल्या वर्षात शिकत असणाऱ्या या विद्यार्थीनने सोशल मीडियावर हा संपूर्ण प्रकार सांगितला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत तिने घडलेली घटना सांगितली.

'मी माझ्या मैत्रिणीबरोबर मार्केटमधून रिक्शेने येत होते. तेव्हा मला कुणीतरी फुगा फेकून मारला. माझ्या पायजम्यावर हा फुगा लागला विशेष म्हणजे त्यातून दुर्गंध येत होता. त्यामुळे फुग्यामध्ये पाणी नव्हतं हे मला समजलं होतं. हॉस्टेलमध्ये पोहचल्यावर जेव्हा मी फुगा लागलेली जागा नीट पाहिली तेव्हा फुग्यामध्ये स्पर्म असल्याचं मैत्रिणीने माझ्या निदर्शनास आणून दिलं. याआधी मी असा प्रकार कधीही पाहिला नव्हता, असं त्या मुलीने इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. होळीच्या बाहाण्याने या मुलांनी जो प्रकार केला आहे त्याचं अतिशय वाईट वाटतं आहे. मस्तीच्या नावाखाली घडलेला हा प्रकार आयुष्यावर किती परिणाम करणारा आहे, असंही त्या विद्यार्थीनीने म्हंटलं. 

या घटनेनंतर विद्यार्थीनींनी #MyWhiteKurta या हॅशटॅग वापरून त्यांच्याबरोबर घडलेल्या अशा घटनांना समोर आणायला सुरूवात केली. विद्यार्थीनींच्या या तक्रारीनंतर कॉलेज प्रशासनाने एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पोलिसांना या घटनांची माहिती देऊन पोलीस सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. 

Web Title: Harassment during Holi: Students of a Delhi college believe balloons with semen were thrown at them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.