गुजरात विधानसभा निवडणूक : नरेंद्र मोदी यांच्या ३४ तर राहुल गांधी यांच्या ३0 सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:29 AM2017-12-14T00:29:10+5:302017-12-14T00:29:49+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप व काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारासाठी अगदी जिवाचे रान केले. भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात ३४ सभा घेतल्या तर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाती घेत मतदारांशी संवाद, थेट गाठीभेठी, चौका-चौकात सभा, बैठका घेतल्या.

Gujarat assembly election: Narendra Modi's 34 and Rahul Gandhi's 30th meeting | गुजरात विधानसभा निवडणूक : नरेंद्र मोदी यांच्या ३४ तर राहुल गांधी यांच्या ३0 सभा

गुजरात विधानसभा निवडणूक : नरेंद्र मोदी यांच्या ३४ तर राहुल गांधी यांच्या ३0 सभा

Next

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप व काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारासाठी अगदी जिवाचे रान केले. भाजपच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात ३४ सभा घेतल्या तर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाती घेत मतदारांशी संवाद, थेट गाठीभेठी, चौका-चौकात सभा, बैठका घेतल्या. त्यांनी ३0 मोठ्या सभा घेतल्या. या दोन्ही नेत्यांनी गुजरातची निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केल्याचे प्रचारातूनही जाणवत होेते.
मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी २२ दिवसांच्या दौºयात विविध भागांत जाऊन प्रचार तर केलाच, पण १२ मंदिरांना भेट देऊन पूजा करून दर्शन घेतले. राहुल गांधी यांनी एखाद्या राज्यात असा झंझावाती प्रचार करण्याची ही तिसरी वेळ होय. यापूर्वी त्यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी जोरदार प्रचार केला होता. राहुल यांनी २५ सप्टेंबरपासून २२ दिवस प्रचार केला. त्यांनी १५० छोट्या सभा घेऊन भाजपच्या अपयशांवर बोट ठेवत काँग्रेसची भूमिका सांगितली. चौका-चौकांत छोट्या सभा घेऊन त्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधत संवाद साधला. संवाद त्यांनी पदयात्रेसह २,६०० किलोमीटरचा प्रवास केला आणि अखेरीस हेलिकॉप्टरचाही वापर केला.
खंबाट-तारापूर रोड (आणंद), लिम्बासी (खेडा), मगरोल व सोजीत्रा (आणंद), पाटण, कुंघेर, आडिया, बोर्तवाडा, हारजी, , मोती चंदूर, धानोआ (पाटण जिल्हा), मेरा, बालोल, मिठा चौक, कच्छ कडवा पाटीदार समाजवाडी, मोधेरा चौकडी, राधनपूर सर्कल, बिलादी बाग विस्तार( मेहसाना जिल्हा) येथे कॉर्नर बैठकांद्वारे त्यांनी मतदारांशी संवाद साधला. तसेच ९ ते ११ डिसेंबर या काळात राहुल यांनी एकाच दिवशी चार-चार ठिकाणी सभा घेतल्या.

गुजरातला ठिकठिकाणी प्रचारसभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ आॅक्टोबर रोजी प्रचाराचा शुभारंभ करून, गुजरातेत ठिकठिकाणी ३४ सभा घेतल्या. मोदी यांच्या या सभा भूज, जसदण, धारी, अलोपाड, मोरबी, प्राची (सोमनाथ), पलितान, नवसारी, भरुच, सुरेंद्रनगर, राजकोटी, धरमपूर, भावनगर, जुनागढ, जामनगर, दाहोद, सुरत, आणंद, मेहसाणा, साणंद, वडोदारा, पाटण कर्णावतीसह ३४ प्रचारसभा झाल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी २१ नोव्हेंबरपासून १२ डिसेंबरपर्यंत ३१ सभा घेत ६६६५ किलोमीटर प्रवास केला.

इतक्या मंदिरात जाण्याची पहिलीच वेळ
राहुल गांधी यांनी दौºयात १२ मंदिरांना भेटी दिल्या. नवसारी, बनासकांठा, पाटण, मेहसाना, अहमदाबाद, अरावली, बोताद येथील प्रसिद्ध मंदिरांत ते दर्शनासाठी गेले होते. काँग्रेसच्या नेत्याने प्रचाराच्या काळात इतक्या मंदिरांत जाण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

Web Title: Gujarat assembly election: Narendra Modi's 34 and Rahul Gandhi's 30th meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.