मच्छीमारांचे आंदोलन; भरूच येथे ‘हिलसा’चा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:44 AM2017-12-04T02:44:33+5:302017-12-04T02:44:45+5:30

भरूच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला ‘हिलसा’ या चवदार माशाचा तडका लाभला आहे. नर्मदा नदी जेथे समुद्राला मिळते, तेथे खाडीपात्रात

Fishermen's Movement; The tussle of 'Hilsa' at Bharuch | मच्छीमारांचे आंदोलन; भरूच येथे ‘हिलसा’चा तडका

मच्छीमारांचे आंदोलन; भरूच येथे ‘हिलसा’चा तडका

Next

भरूच : भरूच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला ‘हिलसा’ या चवदार माशाचा तडका लाभला आहे. नर्मदा नदी जेथे समुद्राला मिळते, तेथे खाडीपात्रात पावसाळ््यात हिलसा माशाची पैदास होते. मच्छीमारांची २५ हजार कुटुंबे या मासेमारीवर वर्षभर पोट भरतात. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारबुतजवळ समुद्रात रस्ता बांधण्याचे भूमिपूजन करण्यात आले. परिणामी, समुद्राचे खारे पाणी व नर्मदेचे गोडे पाणी यांच्या संगमामुळे होणारी हिलसाची पैदास बंद होऊन बेरोजगारीचे स्ोंकट ओढवणार या भीतीने हे मच्छीमार भयभीत आहेत.
भरूच शहरात पोहोचल्यावर बारबुतमधील या नाराजीची कुणकुण लागली. लागलीच २० कि.मी. अंतरावरील हे गाव गाठले. गावचे सरपंच प्रवीणभाई तांडेल, संतोषभाई, अश्विनभाई आणि बारबुत मत्सोद्योग सहकारी मंडळाचे अध्यक्ष रमेशभाई जमा झाले. समोर विस्तीर्ण खाडीपात्र दूरदूरवर पसरले होते. येथून सहा कि.मी. अंतरावर समुद्रात रस्ता बांधण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. यामुळे नर्मदेचे गोडे पाणी आणि समुद्राचे खारे पाणी यांचा संगम होण्याची प्रक्रिया जवळपास बंद होऊन भरूच विधानसभा मतदारसंघातील किनाºयावरील दहेज ते जनोर आणि अंकलेश्वर विधानसभा मतदारसंघातील भालोद ते कट्याजाल या किनाºयालगतच्या मच्छीमारांवर उपासमारीची पाळी येणार आहे. हिलसा माशाला पश्चिम बंगाल, बांगलादेश येथून मोठी मागणी आहे. १५०० रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा हा मासा, दरमहा येथील २५ हजार मच्छीमार कुटुंबाना १० ते १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देतो. माशाची पैदास बंद झाली, तर आमच्या पाच-पाच लाखांच्या बोटी बंद होतील. नर्मदा नदीचे पात्र बदलल्याने याच परिसरातील सुकलातीर्थ व कबीरवडा या पर्यटनस्थळांनाही फटका बसला आहे. तेथील अनेक जण बेरोजगार झाले आहेत. सरदार सरोवर प्रकल्पातून दररोज ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करणे बंधनकारक असताना, पाणी सोडण्यात येत नसल्याची तक्रारही मच्छीमार व परिसरातील नागरिकांनी केली. राज्यातील भाजपा सरकार केवळ उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेते, अशी त्यांची कैफियत आहे. मच्छीमारांनी ‘काम बंद’ आंदोलन केले, निदर्शने केली. मच्छीमारांची नाराजी ही निवडणुकीत डोकेदुखी ठरणार, असे वाटल्यावर भाजपाचे सहकारमंत्री, स्थानिक खासदार, आमदार यांनी बारबुतला धाव घेऊन बाबापुता सुरू केले. मतदानावर बहिष्कार न घालण्याची विनंती केली. निवडणुकीनंतर समुद्रातील रस्त्याचे काम न थांबल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला.

वाघरा, जंबुसरमध्ये कडवे आव्हान
जंबुसर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान आमदार छत्रसिंग मोरी यांना कडवा विरोध आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजयसिंग सोलंकी लढत आहेत. या मतदारसंघातून वरताल स्वामिनारायण संप्रदायाचे देवकिशोर स्वामी यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. ती नाकारण्यात आली. काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी आ. किरण मकवाना यांनाही उमेदवारी दिली नाही. त्याचबरोबर नाराज भाजपा नेते खुमानसी मासिया यांनी रिंगणात उडी घेतली आहे. ही नाराजी हेरुन नरेंद्र मोदी येथे जाहीर सभा घेणार आहेत.

‘झगडिया’त दोन छोटू वसावा
आदिवासीबहुल झगडिया विधानसभा मतदारसंघातून छोटू वसावा हे विजयी होतात. आतापर्यंत भाजपाचे बोट पकडणाºया वसावा यांनी या वेळी काँग्रेसचा हात धरला आहे. मात्र यामुळे काँग्रेसमधील बिगर आदिवासी नेते नाराज आहेत. वसावा व त्यांच्या समर्थकांची या परिसरात दहशत आहे. बाण नितीशकुमार यांच्याकडे गेल्याने या वेळी वसावा यांना चिन्ह बदलावे लागले. जेडीयूने भाजपाच्या सांगण्यावरून छोटू वसावा नावाच्याच एका व्यक्तीला बाण चिन्ह देऊन रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे मतदारांत नवी निशाणी पोहोचवताना वसावा यांची दमछाक होतेय.

Web Title: Fishermen's Movement; The tussle of 'Hilsa' at Bharuch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.