आपणही करू शकतो 'आकाशवाणी'... विमानातून फोनवर बोलण्यास, इंटरनेट वापरास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 04:15 PM2018-05-01T16:15:49+5:302018-05-01T16:15:49+5:30

दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून डिजिटल उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी दूरसंचार आयोगानं उड्डाणादरम्यान मोबाइल सेवा वापराला मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या अधिका-यानं दिली आहे.

Browse internet, make calls while in the air: Govt clears proposal | आपणही करू शकतो 'आकाशवाणी'... विमानातून फोनवर बोलण्यास, इंटरनेट वापरास मंजुरी

आपणही करू शकतो 'आकाशवाणी'... विमानातून फोनवर बोलण्यास, इंटरनेट वापरास मंजुरी

Next

नवी दिल्ली- दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करून डिजिटल उपक्रमांना प्राधान्य देण्यासाठी दूरसंचार आयोगानं उड्डाणादरम्यान मोबाइल सेवा वापराला मंगळवारी सशर्त परवानगी दिली आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या अधिका-यानं दिली आहे. या निर्णयानंतर आता विमान उड्डाण करत असतानाही तुम्हाला मोबाइलवर बोलता येणार आहे.

तसेच इंटरनेटचाही वापर करणं शक्य होणार आहे. दूरसंचार विभागानं विमान उड्डाण करत असताना मोबाइलवर बोलण्याच्या परवानगीसाठी दिलेल्या प्रस्तावाला दूरसंचार नियामक प्राधिकरणा(ट्राय)नंही मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, ट्रायच्या नियमांतर्गत ग्राहक तक्रार निवारण प्रणालीसाठी लोकपालालाही मंजुरी देण्यात आली आहे. लोकपालाची निवड ट्रायच्या नियमांतर्गत होणार आहे. त्यासाठी ट्राय अधिनियमांमध्ये संशोधन करणं गरजेचं आहे. आमच्याकडे तिमाहीत जवळपास 1 कोटी तक्रारी येतात. लोकपालामुळे ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करणं सोपं जाणार आहे.  

तत्पूर्वी तुम्हाला विमानात प्रवेश केल्यानंतर फ्लाइट मोड किंवा स्विच ऑफ करावा लागत होता. उड्डाणादरम्यान विमानात तुम्हाल मोबाइलचा वापर करता येत नव्हता. विमानानं लँडिंग केल्यानंतर तुम्हाला मोबाइलमध्ये नेटवर्क किंवा इंटरनेट सुरू करता येत होतं. परंतु दूरसंचार विभागाच्या निर्णयामुळे तुम्हाला विमान अवकाशात झेपावलं असतानाही नातेवाइकांशी मनमोकळेपणानं गप्पा मारता येणार आहे.  

Web Title: Browse internet, make calls while in the air: Govt clears proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.