विचित्र अपघात; रेल्वेचा डब्बा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे दोन तुकडे, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 01:44 PM2023-12-31T13:44:21+5:302023-12-31T13:45:36+5:30

तुम्ही ट्रकवर रेल्वेचा डब्बा घेऊन जात असल्याची घटना क्वचितच पाहिली असेल.

Bihar Bhagalpur truck carrying a train coach met with an accident reportedly due to brake failure | विचित्र अपघात; रेल्वेचा डब्बा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे दोन तुकडे, पाहा VIDEO...

विचित्र अपघात; रेल्वेचा डब्बा घेऊन जाणाऱ्या ट्रकचे दोन तुकडे, पाहा VIDEO...

भागलपूर: ट्रेनद्वारे प्रवाशांसह मालदेखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवला जातो. तुम्ही अनेकदा मालगाडीवर विविध मोठ्या वस्तूंसह मोठ-मोठी वाहनेदेखील पाहिली असतील. पण, आज सकाळी बिहारच्या भागलपूरमधून एक असे दृश्य पाहायला मिळाले, ज्याचा कुणी विचारही केला नव्हता.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, भागलपूरमध्ये एक ट्रक चक्क रेल्वेचा डबा घेऊन जात होता. यावेळी ट्रक रेलिंगला धडकून मोठा अपघात झाला. यात ट्रकचा पुढील भाग तुटून एका बाजूला पडला. शहरातील उल्टा पुलाजवळ ही घटना घडली. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात खूप गंभीर असू शकला असता, पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे वेगळा झाल्याचे दिसत आहेत. तसेच, रेल्वेचा डबा ट्रकच्या मागील भागावर ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. ही विचित्र घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. हा ट्रक आणि त्यावर ठेवलेला रेल्वेचा डब्बा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते.

Web Title: Bihar Bhagalpur truck carrying a train coach met with an accident reportedly due to brake failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.