केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:31 PM2023-12-20T13:31:06+5:302023-12-20T13:31:48+5:30

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतर महाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

after kerala this 2 states of maharashtra goa also have covid jn 1 variant | केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

Corona JN.1 Variant  ( Marathi News ) : देशात कोरोना व्हायरसची पुन्हा एकदा धास्ती वाढली आहे. देशात दररोज कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. चिंतेची बाब म्हणजे केरळनंतर आणखी दोन राज्यांमध्ये कोविडच्या नवीन सब-व्हेरिएंट JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाची सक्रिय प्रकरणे दररोज वाढत आहेत आणि 2000 च्या वर गेली आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतरमहाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रात एक तर गोव्यात १८ प्रकरणे समोर आली आहेत. दररोज नवीन प्रकारांची प्रकरणे वाढत आहेत. हा व्हेरिएंट अमेरिका, सिंगापूर आणि चीनमध्येही पसरला आहे. या व्हेरिएंटची वाढती प्रकरणे पाहाता जागतिक आरोग्य संघटनेने याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असे म्हटले आहे. 

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता तज्ज्ञांनी लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे देखील आवश्यक आहे. दरम्यान, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नये, असे दिल्लीच्या राजीव गांधी रुग्णालयातील कोविड नोडल अधिकारी असलेले डॉ. अजित जैन यांनी एका हिंदी न्यूज पोर्टला सांगितले.  

या व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. सध्या या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य असली तरी ज्याप्रकारे प्रकरणे वाढत आहेत, ते लक्षात घेता सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषत: वृद्ध रुग्ण आणि ज्यांना आधीच गंभीर आजार आहे. त्यांनी विशेष काळजी घ्यावी. नवीन व्हेरिएंटच्या तपासणीसाठी जीनोम सीक्वेंसिंग वाढवले पाहिजे. तेव्हाच समजेल की, या व्हेरिएंटमुळे किती लोक संक्रमित झाले आहेत, असे डॉ. अजित जैन म्हणाले.

याचबरोबर, या व्हेरिएंटचा प्रसार कम्युनिटीमध्ये झाला आहे की नाही, हेही पाहावे लागेल. जर झाला असेल तर येत्या आठवड्यात कोविड संदर्भात सतर्कता वाढवावी लागेल. सध्या कोरोनाची आकडेवारी पाहिली तर केरळ वगळता इतर सर्व राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, तरीही लोकांना सतर्क राहावे लागणार आहे, असे डॉ. अजित जैन यांनी सांगितले. 

Web Title: after kerala this 2 states of maharashtra goa also have covid jn 1 variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.