ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 21 - एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला असून शेजारी राहणारा 13 वर्षाचा मुलगा त्या बाळाचा बाप असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनतंर कोल्लम पोलिसांनी या मुलाला आपल्या ताब्यात घेतलं. कोल्लम बाल न्याय मंडळासमोर त्याला हजर करण्यात आलं असता त्याची जामिनावर सुटका करत पालकांसोबत पाठवण्यात आलं. 
 
काही दिवसांपुर्वी अशीच एक घटना समोर आली होती ज्यामध्ये 16 वर्षाच्या मुलीने बाळाला जन्म दिला होता. एक 12 वर्षाचा मुलगा त्या बाळाचा बाप असल्याचं समोर आलं होतं. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांपुर्वी नववीत शिकत असलेल्या मुलीने बाळाला जन्म दिला. आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार तिने पालकांकडे केली होती. तपासणी केली असता डॉक्टरांनी ती गरोदर असल्याची माहिती दिली. डॉक्टरांनी तिला एका चांगल्या रुग्णालयात भर्ती करण्याचा सल्ला देऊन घरी पाठवलं. मात्र घरी पोहोचचात मुलीला प्रसूतीकळा सुरु झाल्या आणि तिने बाळाला जन्म दिला. 
 
यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार केली असता गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीने दिलेल्या जबाबानुसार आपला शेजारी यासाठी जबाबदार असल्याचं सांगितलं. 
 
मुलगा आपल्या नातेवाईकांकडे मंगळुरुमध्ये होता. पोलिसांनी साध्या कपड्यांमध्ये जाऊन त्याच्या पालकांच्या उपस्थितीत जबाब नोंद करुन घेतला. यावेळी मुलाने आपण अनेकदा सेक्स केल्याचं मान्य केलं. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केलं. 
 
पोलिसांनी मुलाचे रक्ताचे नमुने घेतली असून त्याच्याआधारे डीएनए चाचणी केली जाणार आहे. यासाठी त्याच्या पालकांची संमती घेण्यात आली. सध्या फक्त मुलीने तक्रार केली असल्याने मुलाविरधात तक्रार नोंद करण्यात आली आहे. दोघेही अल्पवयीन असल्याने पोलीस कायदेशीर सल्ला घेत आहेत.