येवला महसूल मंडळ दुष्काळ घोषित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:00 PM2019-02-04T17:00:24+5:302019-02-04T17:00:48+5:30

मागणी : धुळगाव येथे ग्रामस्थांची बैठक

Yeola revenue board declare drought! | येवला महसूल मंडळ दुष्काळ घोषित करा!

येवला महसूल मंडळ दुष्काळ घोषित करा!

Next
ठळक मुद्देअनेक वर्षापासून प्रलंबित धुळगाव येथील पालखेड डावा कालव्यावरील एस. के. एफ. (गेट) याबाबतही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

येवला : येवला शहर महसूल मंडळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी धुळगावसह परिसरातील ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली आहे. याबाबत लवकरच पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत, तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंतन करण्यात आले. यंदा दुष्काळाचे दुष्काळाचे चटके बसण्यास सुरु वात झाली आहे. शासनाने तालुक्यातील ६ महसूल मंडळे दुष्काळग्रस्त घोषीत केले आहेत. परंतु येवला महसूल मंडळात शासकीय पर्जन्यमापकावर रिमझिम पावसामुळे आकडे फुगले आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील १६ ते १७ गावांना दुष्काळी सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी रब्बी हंगाम ८० टक्के वाया गेला. जलस्रोताचे साठे गेल्या दोन तीन वर्षापासुन कोरडेठाक आहेत. याकरीता मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रलंबित धुळगाव येथील पालखेड डावा कालव्यावरील एस. के. एफ. (गेट) याबाबतही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी, भाजपाचे बाबा डमाळे, कॉंग्रेसचे प्रांतीक सदस्य एकनाथ गायकवाड , उल्हास गायकवाड, बाळासाहेब गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस सुभाष सोनवणे, राजेंद्र गायकवाड, दत्तात्रेय गायकवाड, दत्तात्रेय सोनवणे, अर्जुन गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, विनायक जाधव, विक्र म गायकवाड, वाल्मीक गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, दिपक गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, भगवान आहेर, विश्वासराव गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, भगवान गायकवाड, निलेश महाले, सोमनाथ गायकवाड, नारायण मोरे, रामेश्वर गायकवाड, किरण गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश सोमवंशी यांनी केले.

Web Title: Yeola revenue board declare drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.