पांडवनगरीत भूमिगत गटारीचे पाणी दुतर्फा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:32 AM2018-09-04T00:32:41+5:302018-09-04T00:33:15+5:30

पांडवनगरी परिसरात काही इमारतींचे भूमिगत गटारीचे चे पाणी दुतर्फा वाहत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

 The underground drainage water of the Pandavnagar subdivision | पांडवनगरीत भूमिगत गटारीचे पाणी दुतर्फा

पांडवनगरीत भूमिगत गटारीचे पाणी दुतर्फा

googlenewsNext

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात काही इमारतींचे भूमिगत गटारीचे चे पाणी दुतर्फा वाहत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  सुमारे पंधरा वर्षांपूर्वी विशेष सरकारी योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योजनेतून पांडवनगरी वास्तवात आली. सुमारे दीड ते दोन हजार सदनिका असून, यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक वास्तव करीत आहेत. परंतु पंच्याहत्तर टक्के घरमालक धुळे, मालेगाव, कळवण यांसह विविध गावांना स्थायिक झाले आहेत. त्यामुळे परिसरातील पंच्याहत्तर टक्के सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आलेले आहे. सदर घरमालकांना आपल्याकडे कोण भाडेकरू आहे. याचा थांगपत्ता लागत नाही. कारण की त्यांच्या घराचे भाडेतत्त्वावर देण्या-घेण्याचा व्यवहार दलाल करीत आहे. सुमारे पंच्याहत्तर टक्के भाडेकरू राहत असल्याने इमारतीच्या देखभालीचा खर्च कोणी काढत नाही त्यामुळे दोन इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढणे तसेच भूमित गटांचे आणि शौचालयाच्या चेंबरमध्ये दुर्गंधीयुक्त घाणपाणी दुतर्फा वाहने त्यामुळे परिसरात साथीच्या आजारांची लागण नेहमीच होते.
डासांचा प्रादुर्भाव
जय इमारतींच्या भूमित गटारीचे किंवा शौचालयाच्या टाकीच्या चेंबरमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी दुतर्फा वाहत असेल त्या इमारतीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. इमारतीचे भूमित गटारीचे घाण व दुर्गंधी युक्त पाण्याचे मोठे डबके साचले त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Web Title:  The underground drainage water of the Pandavnagar subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.