ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:09 AM2018-09-25T01:09:57+5:302018-09-25T01:10:13+5:30

सीमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने अ‍ॅक्टिवा दुचाकीला दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२४) सकाळी नाशिकरोड-बिटको पॉइंटच्या दुर्गा उद्यानाजवळ घडली़

 Two-wheelers killed in trucks | ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील युवक ठार

Next

नाशिक : सीमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने अ‍ॅक्टिवा दुचाकीला दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२४) सकाळी नाशिकरोड-बिटको पॉइंटच्या दुर्गा उद्यानाजवळ घडली़ अमोल बाबाजी शेळके (१८, गायकवाड मळा, नाशिकरोड) असे अपघातातमृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, तो आरंभ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे़  गायकवाड मळ्यातील रहिवासी असलेला अमोल शेळके हा सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिवा दुचाकीत (एमएच १५, जीके ६९९७) पेट्रोल टाकण्यासाठी स्टेशनच्या दिशेने जात होता़ रजनीगंधा हॉटेलसमोर सीमेंटच्या गोण्या भरून घेऊन जाणाºया भरधाव ट्रकने (एमएच १५, सीके ३६०) अमोलच्या अ‍ॅक्टिवाला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोलच्या अंगावरून ट्रकचे टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, नाशिकरोड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  Two-wheelers killed in trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.