इमारतीचा जिना कोसळून दोघे जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 04:37 PM2019-07-05T16:37:29+5:302019-07-05T16:42:35+5:30

नाशिक शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पंचवटी महापालिका विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

Two people injured in building collapses | इमारतीचा जिना कोसळून दोघे जण जखमी

इमारतीचा जिना कोसळून दोघे जण जखमी

Next
ठळक मुद्देनाशकात जुन्या इमारतीचा जीना कोसळून अपघातपावसामुळे झालेल्या अपघातात महिलेसह दोन जखमी सुकेणकर लेनमधील श्रीराम अपार्टमे येथील घटना

नाशिक : शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पंचवटी महापालिका विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
या घटनेत सरिता जैन (50), व धीरज लालवाणी (30) असे दोघे जण जखमी झाले आहे. सदरची इमारत सुमारे 35 ते 40 वर्षांपूर्वी असल्याने त्यातच इमारतीचा जिना जीर्ण झाल्याने कोसळल्याची घटना घडल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. जिना कोसळल्याच्या घटनेनंतर पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीत राहणाऱ्या अन्य नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढणयाचे काम केले. सुकेणकर लेन परिसरात श्रीराम अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटमध्ये दहा ते बारा सदस्य राहत असून इमारत जुनी झाल्याने इमारतींचे जीनेही जीर्ण झालेले आहेत.यातील एक शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमाराला पाऊस सुरू असताना कोसळला. इमारतीत राहणाऱ्या सविता जैन  या कपडे सुकविण्यासाठी जात असताना अचानक जिना कोसळला त्यावेळी जिन्यात उभा असलेला धीरज ललवाणी हा देखील जिन्यासह खाली पडला. या घटनेत जैन व ललवाणी हे दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.दरमम्यान, इमारतीतील नागरिकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले असून ज्या नागरिकांची राहायची व्यवस्था नाही त्यांना तात्पुरती महापालिका प्रशासनाकडून व्यवस्था करून दिली जाणार असल्याचे विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले. ज्या इमारतीत दुर्घटना घडली त्या इमारतीचा भाग धोकेदायक झाल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावल्याचेही यावेली प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Two people injured in building collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.