इगतपुरी तालुक्यात तीन अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:52 PM2017-12-02T17:52:35+5:302017-12-02T17:53:14+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात शुक्र वारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान कसारा घाटात एक कार तब्बल चारशे मीटर दरीत कोसळूनही या कारमधील सहा जण सुखरूप बचावले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालक फरार झाले आहेत.

Two killed in three accidents in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात तीन अपघातात दोघे ठार

इगतपुरी तालुक्यात तीन अपघातात दोघे ठार

Next

घोटी : इगतपुरी तालुक्यात शुक्र वारी रात्री झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान कसारा घाटात एक कार तब्बल चारशे मीटर दरीत कोसळूनही या कारमधील सहा जण सुखरूप बचावले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन चालक फरार झाले आहेत.
इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर रस्त्यावर पिंपळगाव मोर शिवारात शुक्र वारी संध्याकाळी मॅजिक वाहन क्र मांक एम.एच.१५, पी.एम.८९८१ आणि कंटेनर वाहन एम.एच. २०,डी. इ.४०५१ या वाहनानी समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला .या अपघातात चालक विठठल भारमल वय.३४ हा जागीच ठार झाला.दरम्यान हा अपघात इतका भयाण होता की,चालक जखमी अवस्थेत वाहनात अडकून पडला होता. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी चालकाला लोखंडी पत्रे कापून बाहेर काढले. मात्र यश आले नाही. दरम्यान दुसरा अपघात टाके देवगाव शिवारात झाला यात त्र्यंबकेश्वरवरून खोडाळा येथे मका घेऊन जाणार ट्रक खोडाळा घाटात चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला.यात अमृता मधुकर बोडके (५५) हा हमाल जागीच ठार झाला.दरम्यान या दोन्ही अपघातानंतर दोन्ही वाहनचालक फरार झाले आहेत.
दरम्यान तिसरा अपघात मुंबई आग्रा महामार्गावर कसारा घाटात झाला.मुंबईहून नाशिककडे येणारी व्हागणार कार जुन्या घाटात चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने तब्बल चारशे फूट दरीत कोसळली.दरम्यान या वाहनामधील सहा प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ते किरकोळ जखमी झाले.
याबाबत घोटी पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जगताप,विश्वास पाटील आदी करीत आहेत.

Web Title: Two killed in three accidents in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.