मानोरीत दोन एकर डाळिंब बाग भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:09 PM2019-05-04T15:09:12+5:302019-05-04T15:09:40+5:30

मानोरी :डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्र्रक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांना आपल्या तब्बल दोन एकर बागेवर कु-हाड चालवत भुईसपाट केला आहे.

Two acre pomegranate garden ground floor | मानोरीत दोन एकर डाळिंब बाग भुईसपाट

मानोरीत दोन एकर डाळिंब बाग भुईसपाट

Next

मानोरी : येवला तालुक्यात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना थेंबे - थेंबे तळे साचे करून तहान भागवित असताना दुसरीकडे भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्याने येवला तालुक्यातील मानोरी बुद्र्रक येथील शेतकरी राजेंद्र शेळके यांना आपल्या तब्बल दोन एकर बागेवर कु-हाड चालवत भुईसपाट केला आहे.या दोन एकर बागेत एकूण सातशे पन्नास डाळिंब बागेचे झाडे अस्तित्वात होती. मागील दीड ते दोन महिन्यांपासून उष्णता सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत चालली असताना राजेंद्र शेळके यांना डाळिंब बाग जगविणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले होते तसेच जमिनीतील भूजल पातळीत कमालीची घट होत गेली. त्यामुळे बागेला पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्या तीन एकर डाळिंबाच्या बागेवर उघड्या डोळ्यादेखत कुºहाड चालविण्याची नामुष्की ओढावली. मोठ्या अपेक्षेने डाळिंब बाग पिकवून दर्जेदार उत्पादन घेण्याच्या आशेवर पूर्णत: पाणी फेरले असून ऐन दुष्काळात लाखो रु पयांचा खर्च आणि मेहनत वाया गेल्याची माहिती शेतकरी राजेंद्र शेळके यांनी दिलीे.

Web Title: Two acre pomegranate garden ground floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक