उड्डाणपुलाच्या कामाने महामार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:10 AM2018-12-17T00:10:41+5:302018-12-17T00:24:57+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.

The traffic congestion on the highway for the flyover works | उड्डाणपुलाच्या कामाने महामार्गावर वाहतूक कोंडी

उड्डाणपुलाच्या कामाने महामार्गावर वाहतूक कोंडी

Next
ठळक मुद्देबळीमंदिर : रोजच सायंकाळी वाहनांच्या लागतात रांगा

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, के. के. वाघ ते कोणार्कनगरपर्यंत महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, पण रविवारी (दि.१६) सकाळी १० वाजेच्या सुमारास बंद पडलेल्या मालवाहतूक गाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे महामार्गावरून ओझरकडे जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक बसला शिवाय बळीमंदिर ते अमृतधाम चौफुली दरम्यान अडकलेल्या वाहनांना पुढे वा मागे जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने बंद पडलेली मालवाहतूक गाडी सुरू होईपर्यंत बराचकाळ वाट पहावी लागली असल्याचे समजते. शिवाय महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कर्मचाºयांनी वाहतूक के. के. वाघपासून सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली, पण अमृतधाम व रासबिहारी चौफुली येथे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. पण या निमित्ताने उड्डाणपुलाचे काम करणाºया ठेकेदाराने आपत्कालीन स्थितीसाठी
क्रे नची व्यवस्था होऊ शकली नसल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभ्या असलेल्या कर्मचाºयांनी धक्का मारून गाडी काढण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.


त्यानंतर बराच काळानंतर धक्का मारूनच वाहन बाजूला करून मार्ग सुरळीत करण्यात आला असला तरी येथील वाहतूककोंडीची समस्या बिकट होत आहे. शिवाय अमृतधाम आणि रासबिहारी रोडने येणाºया मालवाहतूक वाहने सर्व्हिस रोडने जात येतात त्यामुळे सर्व्हिस रोड ब्लॉक होतो शिवाय त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांना सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

Web Title: The traffic congestion on the highway for the flyover works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.