चांदवड तालुक्यात केंद्रीय समितीचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 01:00 AM2018-12-07T01:00:34+5:302018-12-07T01:02:28+5:30

चांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी प्रश्न यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्याचे दर्शन या दौऱ्यात समितीच्या सदस्यांना झाले. ही समिती मनमाड कडून सायंंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यात कडोकोट पोलीस बंदोबस्तात आली.

Tour of Central Committee in Chandwad taluka | चांदवड तालुक्यात केंद्रीय समितीचा दौरा

चांदवड तालुक्यातील हरणुल येथील शेतकरी वैजंयती भोसले यांच्या शेतातील पाहणी करतांना केंद्रीय पाहणी पथकाचे अधिकारी, समवेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व अधिकारी वर्ग.

Next
ठळक मुद्देचांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा

चांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी प्रश्न यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्याचे दर्शन या दौऱ्यात समितीच्या सदस्यांना झाले.
ही समिती मनमाड कडून सायंंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यात कडोकोट पोलीस बंदोबस्तात आली. केंद्रीय समितीमध्ये श्रीमती छाहवी झा, आर. डी. देशपांडे, अ‍े. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश होता.
यावेळी त्यांच्यासमवेत कृषी व जलसंपदा सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे, चांदवडचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदिंसह तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे, इतर तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके व विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
समिती सदस्यांनी हरनूल येथील शेतकरी नामदेव त्र्यंबक रोैंदळ, हरसूल येथील महिला शेतकरी वैजंयती शिवाजी भोसले यांच्या शेतात जाऊन कांदा, टमाटे, चिक्कू या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.शेतकºयांच्या व्यथाया समितीसमोर परिसरातील शेतकºयांनी व्यथा मांडल्या. त्यात नाशिक जिल्हा बॅकेकडून पूर्वी कर्ज मिळत होते. ती बँक आता शेतकºयांना पुनर्गठन करुन कर्ज देत नसल्याच्या समस्यांही शेतकºयांनी मांडल्या. समितीने तालुक्यात सुमारे दीड तास पाहणी केली. नंतर अंधार झाल्याने दौºयातील काम संपवून ते नाशिककडे रवाना झाले.

Web Title: Tour of Central Committee in Chandwad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार