लासलगावी विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 05:21 PM2019-07-11T17:21:22+5:302019-07-11T17:21:36+5:30

लासलगाव : आषाढी वारीचे औचित्य साधून लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात दिंडी सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यालयातील नववीतील बालकीर्तनकार ह.भ.प. ओमकार महाराज भालेराव यांच्या गोड वाणीतून चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास या अभंगावर आधारित कीर्तन सादर केले. पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रु क्मिणीच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले.

 The students of Lasalagavi students removed | लासलगावी विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

लासलगावी विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

googlenewsNext
ठळक मुद्दे यावेळी हातात भगवे पताके, एनसीसीच्या व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा-झाडे जगवा, वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. पालखी गावप्रदक्षिणा करीत असताना अभंग, संतांवरील भजने सादर करण्यात आली. रिंगण तसेच फुगडी विद्यार्थ्यांंनी खेळली.


लासलगाव : आषाढी वारीचे औचित्य साधून लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात दिंडी सोहळा अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यालयातील नववीतील बालकीर्तनकार ह.भ.प. ओमकार महाराज भालेराव यांच्या गोड वाणीतून चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास या अभंगावर आधारित कीर्तन सादर केले. पालखी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रु क्मिणीच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी वारकरी वेशात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे विद्यार्थ्यांची ही वारी जणू पंढरपुरी निघाल्याचा प्रत्यय येत होता. दिंडी उत्साहाने झेंडा चौकातून पुन्हा विद्यालयात आणण्यात आली.यावेळी दिंडीचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, संचालक नीता पाटील, शंतनू पाटील, वैष्णवी पाटील, बाबासाहेब गोसावी , रोशनी गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडी यशस्वीतेसाठी दत्ता महाराज मरकड, केशव तासकर, चंद्रकांत नेटारे, सखाराम गिते, वसंत साबळे, रवींद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. 

Web Title:  The students of Lasalagavi students removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.