अ‍ॅपद्वारे सिन्नरला स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 07:37 PM2018-08-29T19:37:04+5:302018-08-29T19:37:27+5:30

सिन्नर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी १८’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छ भारत मिशन विषयी नागरिकांच्या प्रतिक्रीया नोंदविण्यात येत आहे. त्याची जनजागृती सिन्नर तालुक्यात प्रभावीपणे केली जात आहे.

Sinnar cleans cleanliness through app | अ‍ॅपद्वारे सिन्नरला स्वच्छतेचा जागर

अ‍ॅपद्वारे सिन्नरला स्वच्छतेचा जागर

Next

सिन्नर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी १८’ या मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छ भारत मिशन विषयी नागरिकांच्या प्रतिक्रीया नोंदविण्यात येत आहे. त्याची जनजागृती सिन्नर तालुक्यात प्रभावीपणे केली जात आहे. तालुक्यातील जास्तीतजास्त ग्रामस्थांनी प्रतिक्रिया नोंदविण्याचे आवाहन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड व सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या जिल्'ांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, पंचायत समिती सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिनाभर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. गत सप्ताहात गावांची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या समितीने पाहणी केली. गावातील शौचालय सुविधा, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदि बाबींना प्राधान्य असून या बाबतच्या प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यादृष्टीने पंचायत समिती स्तरावरून सर्व शासकीय व निमशासकीय तसेच गाव पातळीवर अ‍ॅप डाऊनलोड करून अभिप्राय नोंदविण्यात येत आहे. त्या अनशंगाने गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी तालुक्यातील ठाणगाव येथील आठवडे बाजारात फिरून स्वच्छता सर्वेक्षण अ‍ॅप संदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली व जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

Web Title: Sinnar cleans cleanliness through app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.