शेतीसाठी पाणी मागणाया सचिवास मारहाण; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:55 AM2018-03-13T01:55:54+5:302018-03-13T01:55:54+5:30

निमगाव मढ (ता. येवला) येथील अगस्तीमुनी पाणी वापर सहकारी संस्थेच्या सचिवास पालखेड पाटबंधारे विभागाच्या कर्मचाºयांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Seeking water for farming; Filed the complaint | शेतीसाठी पाणी मागणाया सचिवास मारहाण; गुन्हा दाखल

शेतीसाठी पाणी मागणाया सचिवास मारहाण; गुन्हा दाखल

Next

येवला : निमगाव मढ (ता. येवला) येथील अगस्तीमुनी पाणी वापर सहकारी संस्थेच्या सचिवास पालखेड पाटबंधारे विभागाच्या कर्मचाºयांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखेड कालव्यावरील वितरिका क्रमांक ३६ च्या पाणी वाटपातून हा प्रकार घडला. सचिव भाऊसाहेब कांबरे यांच्यावर येवला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निमगाव मढ येथील अगस्तीमुनी पाणी वापर सहकारी संस्थेस चालू आवर्तनाचे पाणी (दि. ८) देण्यात आले होते. या संस्थेच्या लाभक्षेत्रातील फक्त २५ टक्के लाभधारक शेतकºयांना पाणी मिळाले. संस्थेचे ७१ क्यूसेस पाणी शिल्लक असताना कमी प्रवाहामुळे पाणी भरणे पूर्ण होऊ शकले नाही. आज तुमचे गेट बंद करा असे कर्मचारी रामा सदावर्ते व भागवत चव्हाण यांनी सचिवास सांगितले. मात्र, आमचे शिल्लक ७५ टक्के शेतकरी पाण्यावाचून वंचित असून, भरणे झाल्यावरच पाणी बंद करतो, अशी सचिव कांबरे यांनी भूमिका घेतली. संस्थेचे भरणे झाल्याशिवाय पाणी बंद करू नका, असे सांगितले. मात्र त्यानंतरही दमदाटी करत कर्मचाºयांनी कांबरे यांना मारहाण केली.
आमच्या अगस्तीमुनी संस्थेस परवा पाणी दिले, मात्र ७२१ क्यूसेस असलेले पाणी दोन्ही दिवस ३० ते ४५ गेजने चालले. कर्मचारी गेटहून जाताच पाणी कमी व्हायचे. त्यामुळे क्षेत्राचे भरणे झालेच नाही. आज तुम्ही बंद करा व फॉर्मवर सह्या करा असे म्हटले. मात्र मी नकार देतात तू वाढवा बोलू नको म्हणत मला मारहाण केली.  - भाऊसाहेब कांबरे, सचिव, पाणी वापर संस्था

Web Title:  Seeking water for farming; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.