दप्तराविना भरते शनिवारची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 05:53 PM2019-01-09T17:53:42+5:302019-01-09T17:56:54+5:30

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, क्षमता विकसित करण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रमांतर्गत शनिवारी विद्यार्थ्यांनी दप्तरावीना शाळेत येवून मनसोक्त आनंद घेतला.

Saturday school fills without Daptara | दप्तराविना भरते शनिवारची शाळा

दप्तराविना भरते शनिवारची शाळा

Next

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, क्षमता विकसित करण्यासाठी अभ्यासपूरक विविध उपक्रमांतर्गत शनिवारी विद्यार्थ्यांनी दप्तरावीना शाळेत येवून मनसोक्त आनंद घेतला.
गट चर्चा, सोपे शैक्षणिक साहित्य निर्मिती, वाचन प्रकल्प, गुणवत्ता वाढ प्रकल्प, खेळांचे विविध उपक्रम, शाळा बाह्य विदयार्थी शोध मोहीम, विदयार्थी पुस्तके भेट योजना, दारिद्र रेषेखालील व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय भेट वस्तू, योगासने, प्रात्यक्षिक, स्पर्धा, शालांतर्गत विज्ञान प्रदर्शन, आनंद मेळा या सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांची गुणवत्तेबरोबर शारीरिक व मानिसक विविध कौशल्य त्याच्या अंगी जोपासण्यास मदत होते.
बदलत्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नवीन अभ्यासक्रमांची सांगड घालतांना विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा वाढत जाऊन तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत होत जाऊन बौद्धिक क्षमता कमी होते. त्यांचा आनंद लोप पावत चालला असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी मांडले. यासाठी उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक दिवस आनंदाचा म्हणजे ‘शनिवार आमचा दप्तर विना शाळेचा’ असे आवाहन त्यांनी केले.
शनिवार या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून चित्र साकारणे, विविध कागदी काम, वृक्ष जोपासना करणे, शाळा परिसराची स्वच्छता करणे, विविध घोष वाक्य स्पर्धा, खेळाच्या सांघिक स्पर्धा, गायन स्पर्धा, झाडे लावा झाडे जगवा, प्लॅस्टिक मुक्त भारत, पाणी अडवा पाणी जिरवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत सदृढ भारत या उपक्र मांतर्गत स्पर्धाचे आयोजन केले जाते.

Web Title: Saturday school fills without Daptara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा