सरसंघचालक मोहन भागवत ब्राह्मणगावी देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:34 PM2017-12-01T13:34:07+5:302017-12-01T13:34:18+5:30

ब्राम्हणगाव - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेणार आहेत .

Sarsanghchalak Mohan Bhagwat will give a visit to Brahmanagavi | सरसंघचालक मोहन भागवत ब्राह्मणगावी देणार भेट

सरसंघचालक मोहन भागवत ब्राह्मणगावी देणार भेट

googlenewsNext

ब्राम्हणगाव - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेणार आहेत . गेल्या वर्षी भागवत यांनी प्रवीणच्या आई वडिलांना भेटीचे आश्वासन दिले होते.
प्रवीण शेवाळे यांचे आई वडील मूळ टाकळी ता . मालेगांव येथील असून गेल्या २७ वर्षापासून ब्राम्हणगावी शिवन काम व गावावर शेती करून आपला चरितार्थ चालवितात. प्रवीण त्यांना एकुलता एक मुलगा असून खडतर परिस्थितीत त्याने आपले एमएसडब्लूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे . लहानपणापासून संघात जात असल्याने त्याच्या कार्याची तळमळ पाहुन संघानेही त्याचेवर मोठी जबाबदारी देत शिलाँग , मेघालय, गुवाहाटी , मेघालय आदि दुर्गम ठिकाणी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम पाहत आहे. भागवत आपल्या सर्वसामान्य कुटुंबात येत असल्याने शेवाळे कुटूंबियांसह गावात उत्साहचे वातावरण आहे. भागवत यांच्या स्वागतासाठी जिल्हा व तालुका संघानेही तयारी सुरू केली आहे .

Web Title: Sarsanghchalak Mohan Bhagwat will give a visit to Brahmanagavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.