‘त्या’ वाहनांच्या शोधासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:10 AM2018-03-22T00:10:36+5:302018-03-22T00:10:36+5:30

मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दंड न भरताच पळवून नेलेल्या वाळूच्या १० ट्रक शोधण्यासाठी महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अंमळनेर, जि. जळगाव येथील भगवती बिल्डिंग सप्लायर्स यांचा रेतीघाट निलंबित करण्याचे पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

 Running for 'those' vehicles | ‘त्या’ वाहनांच्या शोधासाठी धावपळ

‘त्या’ वाहनांच्या शोधासाठी धावपळ

Next

मालेगाव : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून दंड न भरताच पळवून नेलेल्या वाळूच्या १० ट्रक शोधण्यासाठी महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. अंमळनेर, जि. जळगाव येथील भगवती बिल्डिंग सप्लायर्स यांचा रेतीघाट निलंबित करण्याचे पत्र जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सोमवारी मध्यरात्री ४४ लाख ६५ हजार ५२५ रुपये महसूल बुडवून वाळूमाफियांनी तहसील आवारातून ट्रक पळवून नेले आहेत. या प्रकाराची अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी गंभीर दखल घेतली आहे. येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांना दहाही वाहनांचा शोध घेऊन महसूल विभागाकडे जमा करण्याचे पत्र देण्यात आले आहे.  पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. राज्यभरातील टोलनाके व उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना ट्रकचे क्रमांक देण्यात आले आहेत. पोलिसांनी पळवून नेलेल्या या ट्रक्सचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना आव्हान देण्याचा प्रकार वाळूमाफियांकडून केला गेला आहे. तसेच महसूल विभागाच्या  काही अधिकाºयांच्या वरदहस्तामुळे ट्रक पळविण्याचा प्रकार घडला असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
राजकीय वरदहस्तामुळे मुजोरी
जळगाव येथील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या शहर अध्यक्षाने अपर जिल्हाधिकारी राऊत यांची भेट घेऊन ट्रक सोडून देण्यासाठी दबाव आणला होता. राऊत यांनी दंडाची रक्कम भरून ट्रक घेऊन जा, असे सांगितले. यावर संताप व्यक्त करीत राष्टÑवादीच्या पदाधिकाºयाने धमकी देत कार्यालयाबाहेर पडले होते. याबाबतचा पत्रव्यवहारही अपर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला आहे.
तहसीलदारांकडून मागविला खुलासा
वाळूमाफियांनी दंड न भरता तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्यानंतर अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून खुलासा मागविला आहे. त्यांना पत्र देण्यात आले असून, त्या पत्रात चौकीदार कोण होते? तहसील कार्यालयाचे दोन्ही गेट कुलूप बंद होते मग कुलूप कोणी उघडले. नियुक्त असलेल्या चौकीदाराने तुम्हाला कधी कळविले ? ट्रक तहसील आवारातून पळवून कोणी नेल्या याबाबत खुलासा करण्याचे म्हटले आहे.

Web Title:  Running for 'those' vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.