परदेशी खुनातील संशयितांची काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:43 AM2018-06-13T00:43:49+5:302018-06-13T00:43:49+5:30

म्हसरूळ (बोरगड) एकतानगर येथे राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी (२५) या युवकाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून खून करणारे संशयित विजयकुमार पुंडलिक गांगोडे (२४), मयूर राजाभाऊ जाधव (२३) व हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार (२४) या तिघांची म्हसरूळ पोलिसांनी सोमवारी (दि.१२) सायंकाळी बोरगड परिसरातून धिंड काढली. या तिघांना रविवारी (दि.१०) पोलिसांनी अटक केली होती.

 Remarks made by foreign terror suspects | परदेशी खुनातील संशयितांची काढली धिंड

परदेशी खुनातील संशयितांची काढली धिंड

Next

पंचवटी : म्हसरूळ (बोरगड) एकतानगर येथे राहणाऱ्या नितीन दिलीप परदेशी (२५) या युवकाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून खून करणारे संशयित विजयकुमार पुंडलिक गांगोडे (२४), मयूर राजाभाऊ जाधव (२३) व हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार (२४) या तिघांची म्हसरूळ पोलिसांनी सोमवारी (दि.१२) सायंकाळी बोरगड परिसरातून धिंड काढली. या तिघांना रविवारी (दि.१०) पोलिसांनी अटक केली होती.  एकतानगर साती आसरा मंदिराजवळ बाकड्यावर बसलेल्या परदेशी याच्या डोक्यात दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी गोळी झाडून खून केल्याची घटना गत बुधवारी (दि.६) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर संशयित पसार झाल्याने एकतानगर परिसर हादरले होते. म्हसरूळ पोलिसांनी परदेशी याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडून खून केल्याप्रकरणी तिघा संशयितांना अटक केली असली तरी संशयितांनी परदेशी याचा खून का केला याचे मुख्य कारण गुलदस्त्यात आहे. मात्र,
पूर्ववैमनस्यातून ही घटना  घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.  नितीन परदेशी याच्यावर संशयितांनी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडल्याने परदेशी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची परिसरातील दहशत कमी व्हावी तसेच संशयितांबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती दूर व्हावी यासाठी सायंकाळी म्हसरूळ, बोरगड, एकतानगर परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. गेल्या काही दिवसापासून शहरात दहशत पसरविणाºया संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर परिसरातून त्यांची धिंड काढली जात आहे. परिसरामध्ये दहशत निर्माण करून गुन्हेगारी सूत्र हलविणाºया गुंडांचा वचक कमी व्हावा यासाठी संशयित ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून धिंड काढली जात आहे.

Web Title:  Remarks made by foreign terror suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.