बसफेºयांमध्ये कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 10:47 PM2017-09-26T22:47:30+5:302017-09-27T00:32:59+5:30

पंचवटी शहर बस आगाराने नाशिक सीबीएस ते कसबे सुकेणे या शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात केल्याने या मार्गावरील हजारो चाकरमाने, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाच्या कृपेने ओझर-सुकेणे मार्गावर अवैध प्रवाशी वाहतूक मात्र जोमात सुरू असून, प्रवाशी संतप्त झाले आहेत.

 Reduction in buses | बसफेºयांमध्ये कपात

बसफेºयांमध्ये कपात

Next

कसबे सुकेणे : पंचवटी शहर बस आगाराने नाशिक सीबीएस ते कसबे सुकेणे या शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात केल्याने या मार्गावरील हजारो चाकरमाने, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाच्या कृपेने ओझर-सुकेणे मार्गावर अवैध प्रवाशी वाहतूक मात्र जोमात सुरू असून, प्रवाशी संतप्त झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळ नाशिक महानगरात तोट्यात चाललेली शहर बससेवा काही मार्गावर बंद करण्याचा निर्णय घेत असून, त्याचाच भाग म्हणून नाशिकसह लगतच्या ग्रामीण भागातील शहर बसफेºयांमध्ये कपात केली जात आहे. कसबे सुकेणे, ओझर ही गावे नाशिक महानगराशी निगडित असून, या भागातून दररोज हजारो प्रवाशी, चाकरमाने, विद्यार्थी नाशिक शहरात ये-जा करतात. ओझर-सुकेणे ही शहर बससेवा या प्रवाशांना वरदान ठरली असताना, दोन महिन्यांपासून या मार्गावरील बसफेºयांमध्ये कपात केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. नाशिक, सातपूर, अंबड, विल्होळी, आडगाव, पंचवटी, नाशिकरोड, गरवारे, दहावा मैल या भागातील विविध कंपन्या, कार्यालये, तसेच महाविद्यालयांत या भागातील अनेक चाकरमाने, विद्यार्थी दररोज ये- जा करतात. सध्या बसफेºयांमध्ये कपात केल्याने प्रवाशांना दररोज लेटमार्क होत असून, वेळेच्या अपव्यय होत आहे. दरम्यान, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, भाऊसाहेबनगर, ओणे, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, थेरगाव, ओझर, शिलेदारवाडी आदी भागातील प्रवाशी, विविध सामाजिक व राजकीय संघटना महामंडळाच्या या निर्णयामुळे आक्रमक झाल्या आहेत. नाशिक सीबीएस ते ओझर-टाऊनशिप- सुकेणे या मार्गावरील कपात केलेल्या शहर बसफेºया पूर्ववत सुरू कराव्यात, मनपाने बससेवेबाबत योग्य तो  निर्णय घेऊन या मार्गावर बससेवा कायम ठेवावी, पिंपळगाव, लासलगाव, येवला या आगारांनी निफाड-पिंपळस- सुकेणे- ओझर - नाशिक या मार्गावर साधी बससेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रवाशी संघटना दाखल करणार याचिका
४नाशिकमधील शहर बससेवा राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात आहे. एसटीकडून बसफेºयांमध्ये कपात केल्याने होत असलेल्या त्रासाला सर्वसामान्य प्रवासी त्रयस्थ झाले आहेत. कसबे सुकेणे परिसर प्रवाशी संघटना याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रवासी संघटेनचे अध्यक्ष योगेश सगर, उत्तम कातकाडे, विजय औसरकर, सुदाम जाधव, संतोष वाघ यांनी दिली.
अवैध प्रवाशी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात झाल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला अच्छे दिन आले आहेत. नाशिक ते ओझर व ओझर ते सुकेणे या मार्गावर प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. काळीपिवळी व आॅटो रिक्षाचे चालक अक्षरश: कोंबून प्रवासी वाहतूक करत आहेत. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, केवळ शहर बसफेºयांमध्ये कपात या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.

Web Title:  Reduction in buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.