सायखेडा, सोनगाव, भेंडाळी परिसरात वाऱ्यासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:19 AM2018-04-18T00:19:29+5:302018-04-18T00:19:29+5:30

सायखेडा : सायखेडा, सोनगाव, चाटोरी, रामनगर, भेंडाळीसह परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळासह जोरदार पावसाने शेतकरी, कांदा व्यापाºयांची एकच धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.

Rain accompanied by wind and rain in Sikhega, Songaon and Bhandali area | सायखेडा, सोनगाव, भेंडाळी परिसरात वाऱ्यासह पाऊस

सायखेडा, सोनगाव, भेंडाळी परिसरात वाऱ्यासह पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवसांपासून वातावरणात उष्णता निर्माण झाली होती. बेमोसमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती


सायखेडा : सायखेडा, सोनगाव, चाटोरी, रामनगर, भेंडाळीसह परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळासह जोरदार पावसाने शेतकरी, कांदा व्यापाºयांची एकच धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले.
चार दिवसांपासून वातावरणात उष्णता निर्माण झाली होती. बेमोसमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान अचानक आभाळ भरून आले. ढगांचा गडगडाटासह वादळ सुटले आणि पाऊस सुरू झाला.
अचानक आलेल्या पावसाने कांदा खराब, तर वादळामुळे मिरची फुलाची गळ, काढणीसाठी आलेला भाजीपाला खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सायखेडा येथील कांदा व्यापारी आणि परिसरातील शेतकºयांची एकच धावपळ उडाली होती. शेतात कांदा काढणीचे काम सुरू आहे तर काही शेतकºयांचा कांदा शेतात काढून पडला आहे वादळ आणि पाऊस आल्याने कांदा झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली तर काही शेतकºयांचा कांदा जमिनीत असल्याने पावसाच्या पाण्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे. उष्णता प्रचंड असल्याने कांदा जमिनीत तापलेला आहे. त्याला पावसाचे पाणी लागल्याने कांदा लवकर खराब होतो, असा कांदा जास्त काळ टिकत नाही त्यामुळे बेमोसमी पावसाने कांद्याचा वांदा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अचानक आलेल्या पावसाने कांद्याचे नुकसान मोठे नुकसान होण्याची भीती आहे. अनेक शेतकºयांकडे ऐनवेळी झाकण्यासाठी बारदान, कागद आदी नसल्याने एकच धावपळ उडाली. पुन्हा शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.
- जयवंत सातपुते, शेतकरी

Web Title: Rain accompanied by wind and rain in Sikhega, Songaon and Bhandali area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस