जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 01:56 AM2019-03-11T01:56:21+5:302019-03-11T01:59:14+5:30

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात आली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार असून आता पक्षीय उमेदवार निश्चितीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांबद्दल पक्षांतर्गत असलेला विरोध लक्षात घेता नव्या चेहऱ्याला संधी मिळते की, विरोध शमविण्यात दोन्ही पक्षांना यश लाभते, याची उत्सुकता आता लागून आहे.

Question mark on the candidacy of both the existing MPs in the district | जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देनिवडणुकीचे बिगुल वाजले आता लक्ष पक्षीय उमेदवारांच्या निश्चितीकडे, सर्वच पक्षांत रस्सीखेच

नाशिक : सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आणि गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात आली. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार असून आता पक्षीय उमेदवार निश्चितीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांबद्दल पक्षांतर्गत असलेला विरोध लक्षात घेता नव्या चेहऱ्याला संधी मिळते की, विरोध शमविण्यात दोन्ही पक्षांना यश लाभते, याची उत्सुकता आता लागून आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने १७व्या लोकसभेसाठी रविवारी (दि.१०) निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आणि लगोलग आचारसंहिताही लागू झाली. निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पक्षीय उमेदवारांच्या निश्चितीबाबत उत्सुकता वाढली आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत पक्षांतर्गत मोठा विरोध आहे. नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात पक्षातूनच काही इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. त्यातच एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा दुसऱ्यांदा निवडून येत नसल्याची परंपरा नाशिक मतदारसंघाची असल्याने आणि गोडसे यांच्या एकूणच पाच वर्षांतील कामगिरीबद्दल विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्याने त्यांच्याविरुद्ध विरोधाची धार तीव्र होत चालली आहे. अशा परिस्थितीत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत मातोश्रीवर नेमका काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय, नाशिकची जागा शिवसेनेकडे असल्याने ती भाजपाला मिळावी यासाठीही काही इच्छुक पाण्यात देव बुडवून बसले आहेत.
नाशिकप्रमाणेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळणार काय, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. भाजपाने पक्षांतर्गत केलेल्या सर्व्हेनुसार चव्हाण यांच्याविरोधात प्रतिकूल वातावरण असल्याचे समोर आल्याने पक्षात अन्य इच्छुकांच्याही अपेक्षा दुणावल्या आहेत. युतीमध्ये दोन्ही खासदारांबाबत विरोधाचे वातावरण असताना विरोधी पक्षातही उमेदवारीसाठी रस्सीखेच वाढली आहे. प्रामुख्याने, दिंडोरी मतदारसंघात राष्टÑवादीत चुरस दिसून येत आहे. त्यातच, कॉँग्रेस आघाडीत सहभागी होण्यासाठी माकपाने दिंडोरीच्या जागेचा आग्रह धरल्याच्या चर्चेने राष्टÑवादी पेचात सापडली आहे. मागील वेळी लढलेले बसपा, आम आदमी पार्टीची अद्याप भूमिका समोर आलेली नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादीकडून भुजबळ कुटुंबीयातील कोण, याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. तर मागील निवडणुकीत ६ टक्के मते घेणाºया मनसेच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे.
पन्नास दिवस राजकीय घडामोडींचे
सन २०१४ मध्ये नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २४ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यावेळी दिंडोरी मतदारसंघात १० उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर नाशिक मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दिंडोरी मतदारसंघात १७५० मतदान केंद्र, तर नाशिक मतदारसंघात १६६४ मतदान केंद्र होती. आता सतराव्या लोकसभेसाठी दोन्ही मतदारसंघात एकाच वेळी २९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. आता पुढील ५० दिवसांत जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Web Title: Question mark on the candidacy of both the existing MPs in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.