जात पडताळणी समितीची रिक्त पदे भरा

By admin | Published: August 10, 2015 11:07 PM2015-08-10T23:07:49+5:302015-08-10T23:10:59+5:30

साकडे : आदिजन सेवा संघातर्फे निवेदन

Please fill vacancies of the caste verification committee | जात पडताळणी समितीची रिक्त पदे भरा

जात पडताळणी समितीची रिक्त पदे भरा

Next

नाशिक : आदिवासी जात पडताळणी विभागात कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून, ती तत्काळ भरण्यात यावीत, या मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन आदिजन सेवा संघाच्या वतीने आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी जात पडताळणी विभागात कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज असताना अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने त्याचा सरळ परिणाम कामावर होतो. नाशिक व नंदुरबार जात पडताळणी समितीमध्ये लघुटंकलेखक (स्टेनो) हे निम्नश्रेणीचे पद रिक्त आहे. ही पदे थेट उच्च न्यायालयासंदर्भात कामकाज पहात असल्याने त्याचा परिणाम झाला आहे. तसेच नाशिक, कळवण व नंदुरबार येथील इंग्रजी लघुटंकलेखकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे कामकाजावर विपरीत परिणाम झालेला आहे. तसेच जात पडताळणी विभागातील सर्व कागदपत्रांचे डिजीटल स्कॅनिंग करण्यात यावे, खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रकल्प विभागामार्फत आदिवासी मुलांना शाळेसाठी पाठविते. परंतु या शाळा त्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग, वेगळी राहण्याची व्यवस्था करतात. स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये या विद्यार्थ्यांची व्यवस्था होत नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभागानेच या शाळा सुरू कराव्यात यासह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी आदिजन सेवा संघाचे डॉ. प्रशांत भदाणे, नगरसेवक परशुराम वाघेरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Please fill vacancies of the caste verification committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.