मानवजातीची वाटचाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:23 AM2018-03-22T00:23:15+5:302018-03-22T00:23:15+5:30

दिवंगत भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी हे जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाईल, असे भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरत असून, मानवजातीची वाटचाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने होत असून, मनुष्य हळूहळू कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जात असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त अधिकारी आनंद घैसास यांनी केले आहे.

The path of humankind towards artificial intelligence | मानवजातीची वाटचाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने

मानवजातीची वाटचाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने

Next

नाशिक : दिवंगत भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी हे जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जाईल, असे भाकीत केले होते. ते भाकीत खरे ठरत असून, मानवजातीची वाटचाल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने होत असून, मनुष्य हळूहळू कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आहारी जात असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त अधिकारी आनंद घैसास यांनी केले आहे.  एचपीटी महाविद्यालय परिसरातील सभागृहात मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेतील ५१वे पुष्प ‘स्टिफन हॉकिंग आर्टिफिशिअर इंटेलिजन्स’ विषयावर गुंफण्यात आले. यावेळी बोलताना आनंद घैसास म्हणाले, स्टिफन हॉकिंग यांनी विज्ञानाच्या निश्चित नियमांच्या आधारेच ब्रह्मांडाची निर्मिती झाल्याचे विचार मांडले आहे.  आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे असल्याने प्रत्येक युवकाने वैज्ञाणिक दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे.  यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती व तिचे कार्य याची सविस्तर रचनाही विविध चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगताना त्यांनी उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसनही केले. प्रास्ताविक सचिन मालेगावकर यांनी केले. संगीता मुगल यांनी सूत्रसंचालन केले. शीतल चौगुले यांनी आभार मानले. ज्या गोष्टी मानवासाठी अनाकलनीय आहेत, त्याच्या निर्मितीमागे देव असल्याच्या कल्पनेतून माणसानेच देवाची निर्मिती केली आहे. त्यामुळे बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करणे शक्य असून, यासाठी कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून ब्रह्मांडातील वेगवेगळ्या गोष्टींचे तथ्य पडताळून पाहणे शक्य असल्याचे घैसास म्हणाले.

Web Title: The path of humankind towards artificial intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक