एकलहरे परिसरात गहू सोंगणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:53 PM2019-03-29T17:53:01+5:302019-03-29T17:54:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सर्वत्र गहू सोंगणीच्या कामाला वेग आला आहे. नाशिक पूर्व ...

nsk,wheat,gown,in,eklavhar,area | एकलहरे परिसरात गहू सोंगणीला वेग

एकलहरे परिसरात गहू सोंगणीला वेग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सर्वत्र गहू सोंगणीच्या कामाला वेग आला आहे.
नाशिक पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, एकलहरेगाव आदी गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून शेतकरी वर्ग गहू काढणीच्या कामात व्यस्त आहे. या भागातील गावांमध्ये हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने गहू सोंगणीचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. हार्वेस्टर मशीनद्वारे शेतात वाळलेला गहू मळला जातो. मशीनमधून गव्हाचे दाणे एका बाजूला, तर भुसा दुसऱ्या बाजूला पडतो. हार्वेस्टर मशीनच्या एका टाकीत सुमारे १८ ते २० क्विंटल गहू साचला की तो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत किंवा शेतात ताडपत्रीवर टाकून पोत्यांमध्ये भरला जातो. गहू काढण्याचा मोबदला म्हणून हार्वेस्टर मशीनचालकाला एकरी १८०० ते २००० रुपये मजुरी दिली जाते. यंत्राने सोंगणी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे. त्यामुळे मजुरीचा खर्च आणि वेळेची बचत होते.

Web Title: nsk,wheat,gown,in,eklavhar,area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.