नॅशनल उर्दू शाळेची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:03 AM2019-02-21T01:03:41+5:302019-02-21T01:03:58+5:30

जुन्या नाशकातील सारडा सर्कल येथील युथ एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये हाजी नासिर खान-बबलू पठाण यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

National Urdu school election uncontested | नॅशनल उर्दू शाळेची निवडणूक बिनविरोध

नॅशनल उर्दू शाळेची निवडणूक बिनविरोध

googlenewsNext

नाशिक : जुन्या नाशकातील सारडा सर्कल येथील युथ एज्युकेशन अ‍ॅन्ड वेल्फेअर सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये हाजी नासिर खान-बबलू पठाण यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी अलीम शेख, सचिव प्रा. जाहिद शेख, सहसचिव एजाज काजी, हबीब खान पठाण यांच्यासह कार्यकारिणी सदस्य म्हणून अड. एजाज सय्यद व सलीम सय्यद यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
नॅशनल उर्दू विद्यालय व महाविद्यालयात सुमारे ८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. ही शहरातील सर्वाधिक जुनी मुस्लीम शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेची कार्यकारिणीची मुदत या फेब्रुवारी अखेर संपणार होती म्हणून सर्वसाधारण सभेत सन २०१९ ते २०२४ या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्र म जाहीर करण्यात आला.
या कार्यक्रमानुसार १२ फेबु्रवारीपासून प्रक्रिया सुरू येत्या २४ तारखेला मतदान होणार होते; मात्र माघारीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (दि.१९) विद्यमान पदाधिकाऱ्यां-व्यतीरिक्त इतर कोणाचेही उमेदवारी अर्ज सादर न झाल्याने केवळ विद्यमान पदाधिकारी यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विद्यमान पदाधिकाºयांची बिनविरोध निवड जाहीर करून प्रमाणपत्र प्रदान  केले.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड सिकंदर सय्यद यांनी काम पाहिले. सुरुवातीपासून संस्थेचे सभासद सदर निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता प्रयत्नशील होते. परंतु सर्व सभासदांना संधी देण्यासाठी निवडणूक घेण्यात यावी, असे विद्यमान कार्यकारिणी सदस्यांनी सांगितल्याने रीतसर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

Web Title: National Urdu school election uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.