सत्कारार्थींच्या खात्यावर सहा दिवसांनी पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:36 AM2017-10-24T01:36:34+5:302017-10-24T01:36:49+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीचा सोहळा उलटून सहा दिवसांनी शेतकºयांच्या बॅँक खात्यावर पैसे जमा झाले असून, अजूनही जिल्ह्णातील नेमक्या किती शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ होईल याबाबत निश्चित आकडेवारी जिल्हा बॅँक वा सहकार खात्याला उपलब्ध झालेली नाही.

 Money after six days on account of good deeds | सत्कारार्थींच्या खात्यावर सहा दिवसांनी पैसे

सत्कारार्थींच्या खात्यावर सहा दिवसांनी पैसे

Next

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीचा सोहळा उलटून सहा दिवसांनी शेतकºयांच्या बॅँक खात्यावर पैसे जमा झाले असून, अजूनही जिल्ह्णातील नेमक्या किती शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ होईल याबाबत निश्चित आकडेवारी जिल्हा बॅँक वा सहकार खात्याला उपलब्ध झालेली नाही.  दिवाळीपूर्वी शेतकºयांची कर्जमाफी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री तसेच सहकारमंत्र्यांनी यापूर्वीच  करून ठेवल्यामुळे बुधवार, दि. १८ आॅक्टोबर रोजी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी राज्यातील प्रत्येक जिल्ह्णात शेतकरी कर्जमाफी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य समारंभ मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तर जिल्ह्णाच्या मुख्यालयी पालकमंत्री वा तत्सम मंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमुक्ती सोहळा घेण्यात आला. या सोहळ्यात कर्जदार शेतकºयांचा सपत्नीक साडी, चोळी देऊन सत्कार करण्याबरोबरच, कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र शेतकºयांच्या  हातात देण्यात आले. नाशिक जिल्ह्णातील प्रत्येक तालुक्यातील दोन याप्रमाणे ३० शेतकरी दाम्पत्याचा संरक्षण राज्यमंत्री  डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title:  Money after six days on account of good deeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.