कायझेन स्पर्धेत महिंद्रा संघाला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:35 AM2018-07-15T01:35:05+5:302018-07-15T01:35:57+5:30

सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कायझेन स्पर्धेत मोठ्या गटात नाशिकच्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील २० कारखान्यांचे संघ सहभागी झाले होते.

Mahindra team's first place in the KaiZen Championship | कायझेन स्पर्धेत महिंद्रा संघाला प्रथम क्रमांक

कायझेन स्पर्धेत महिंद्रा संघाला प्रथम क्रमांक

Next

सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कायझेन स्पर्धेत मोठ्या गटात नाशिकच्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील २० कारखान्यांचे संघ सहभागी झाले होते.
अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात सीआयआयच्या वतीने पश्चिम विभागीय कायझेन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील २० संघ आणि १०० स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेत नावीन्यपूर्ण बदल सुचविणारे महत्त्वपूर्ण कायझेन सादर करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक मोठ्या उद्योगासाठी महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र नाशिक, द्वितीय गुजराथ
गार्डियन्स गुजराथ, तृतीय किर्लोस्कर न्यूमॅटिक्स कंपनी महाराष्ट्र
तर उत्तेजनार्थ प्रथम टाटा मोटर्स गुजराथ, इपकॉस कंपनी महाराष्ट्र, जॉन डिअर मध्य प्रदेश यांनी पटकावला. लघु आणि मध्यम उद्योग गटात प्रथम एसबी रेशलर्स महाराष्ट्र, द्वितीय अमोद इंडस्ट्रीज, तृतीय गुणेबो इंडिया गुजराथ यांनी पटंकावला. परीक्षक म्हणून पी. के. जोशी, सतीश तावडे, जॉर्ज मॅथ्यू आदींनी काम पाहिले.
स्पर्धेतील विजेत्या संघांना सीआयआय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील बापट, कायझेन समितीचे अध्यक्ष अनिल जंगले आणि अजय विद्याभानू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Mahindra team's first place in the KaiZen Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.