छावणी परिषद उपाध्यक्षपदी कटारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:32 AM2019-06-26T00:32:04+5:302019-06-26T00:32:28+5:30

देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे भगवान कटारिया यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

 Kataria for the post of Vice Chancellor | छावणी परिषद उपाध्यक्षपदी कटारिया

छावणी परिषद उपाध्यक्षपदी कटारिया

Next

देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे भगवान कटारिया यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. देवळाली छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा प्रभावती धिवरे यांनी ठरलेल्या रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीकरिता अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवक सचिन ठाकरे यांनी छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी भगवान कटारिया यांच्या नावाची सूचना मांडली. नगरसेवक बाबूराव मोजाड यांनी अनुमोदन दिले. कटारिया यांच्या व्यतिरिक्त उपाध्यक्षपदासाठी कोणाचेही नाव न आल्याने एकमताने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले.
सदर निवडणूक बिनविरोध होणार होती. त्यासाठी भाजपाच्या वतीने जोरदार प्रयत्नदेखील करण्यात आले. भाजपाच्या कोट्यातील रोटेशन आणि दिलेला शब्द पाळत कटारिया यांची निवड अपेक्षित होती. त्यांना इतर पक्षीय सदस्यांकडूनदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे केवळ तांत्रिक औपचारिकता पूर्ण करून निवडणूक बिनविरोध पार पडली.
जोरदार आनंदोत्सव
छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी भगवान कटारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून जोरदार आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर देवळालीच्या मुख्य मार्गावरून कटारिया यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, सुनील आडके, प्रीतम आढाव, बाबूशेठ कृष्णानी, नरेंद्र माखिजा, होनराज नागदेव, जामनदेव आहुजा, हसानंद निहलानी आदींसह देवळालीवासी उपस्थित होते.

Web Title:  Kataria for the post of Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक