गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे रानडे यांची मैफल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:24 AM2017-11-13T00:24:11+5:302017-11-13T00:24:54+5:30

गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे स्वरसाधना मासिक बैठकीअंतर्गत शनिवारी सायंकाळी आशिष रानडे यांची मैफल रंगली.

Gurveda pt Ranade's concert played by Shankarrao Vairagkar Music Foundation | गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे रानडे यांची मैफल रंगली

गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे रानडे यांची मैफल रंगली

googlenewsNext
ठळक मुद्देविविध राग सादर करून श्रोत्यांची मने जिंकलीमैफलीस परिसरातील रसिकश्रोते उपस्थित छोरा बरसाने की नार सादर करून दाद

नाशिकरोड : गुरुवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठानतर्फे स्वरसाधना मासिक बैठकीअंतर्गत शनिवारी सायंकाळी आशिष रानडे यांची मैफल रंगली. डॉ. अविराज तायडे यांचे शिष्य असलेल्या रानडे यांनी विविध राग सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
दत्तमंदिर चौकातील रामनगर बुद्ध विहारात झालेल्या या मैफलीस परिसरातील रसिकश्रोते उपस्थित होते. विजयालक्ष्मी मनेरीकर यांनी स्वागत केले. पं. शंकरराव वैरागकर यांनी प्रास्ताविक केले. गायक आनंद अत्रे, सुमित्रा पाटोळे, श्रीकांत कुलकर्णी, नंदू खाडे, नंदूशेठ भुतडा, सागर कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. तबल्यावर नितीन पवार, संवादिनीवर दिव्या रानडे यांनी साथसंगत केली. त्यांनी बडा ख्याल सादर केला. एकतालात गोकूल गाव के छोरा बरसाने की नार सादर करून दाद मिळवली. राग कलावतीत ताल रूपकात पिया ना मानत हमरी बात हा राग सादर केला. नंतर इंद्रायणी काठी लागली समाधी या अभंगाला टाळ्या मिळाल्या. भवानी दयानी ही भैरवी गाऊन त्यांनी मैफलीचा समारोप केला. या मैफिलीचे आयोजन सरिता वैरागकर व ओंकार वैरागकर यांनी केले होते. हितेश्वर पाटील यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली. मदन लिंबारे, सार्थक खैरनार, श्रृती बोरसे, प्रणाली शंकपाल, हर्षल गोळेसर, समृद्धी गांगुर्डे आदींनी संयोजन केले.

Web Title: Gurveda pt Ranade's concert played by Shankarrao Vairagkar Music Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.