गंजमाळ फुटपाथवरील फर्निचर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:56 AM2018-11-18T00:56:13+5:302018-11-18T00:56:43+5:30

गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या सोफासेट आणि अन्य साहित्य महापालिकेच्या धडक कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

Ganjmal sewage furniture seized | गंजमाळ फुटपाथवरील फर्निचर जप्त

अतिक्रमण कारवाई : गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले साहित्य जप्त करताना अतिक्रमण विरोधी पथक.

googlenewsNext
ठळक मुद्देधडक मोहीम : तीन ट्रक माल मनपाच्या भंडारात

नाशिक : गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या सोफासेट आणि अन्य साहित्य महापालिकेच्या धडक कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत वाहतुकीला अडथळा असणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र महापालिकेच्या फुटपाथचा अशाप्रकारे बेकायदेशीररीत्या वापर करणाºयांना हा मोठा दणका महापालिकेने दिला आहे. शनिवारी (दि.१७) सायंकाळी अतिक्रमण विरोधी पथकाने गंजमाळ सिग्नल ते जुने बसस्टँडपर्यंत फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले महापालिकेची कारवाई सुरू होताच विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. साहित्य तातडीने दुकानात घेतानाच साहित्य उचलून नेणाºया कर्मचाºयांना काही प्रमाणात विरोध केला. तथापि, पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. या मोहिमेत प्लास्टीकच्या ३०१ खुर्च्या, पाच सोफे, आदि साहित्य जप्त केले, त्यासाठी खास तीन पथक नियुक्त करण्यात आले होते, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.

Web Title: Ganjmal sewage furniture seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.