घोटीतील अपघातात चार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:05 AM2018-06-18T01:05:55+5:302018-06-18T01:06:24+5:30

सिन्नर-घोटी रस्त्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातानंतर गतिरोधकाच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी घोटी-सिन्नर रस्ता तब्बल अर्धा तास रोखून धरला.

 Four killed in a car crash | घोटीतील अपघातात चार जागीच ठार

घोटीतील अपघातात चार जागीच ठार

Next

घोटी : सिन्नर-घोटी रस्त्यावर रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातानंतर गतिरोधकाच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी घोटी-सिन्नर रस्ता तब्बल अर्धा तास रोखून धरला.  घोटीतून उंबरकोनकडे जाणाऱ्या रिक्षाला (क्र . एमएच ०२ यूए ९८०८) एका स्विफ्ट कारने धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षा रस्त्यावर तीन  वेळा उलटत समोरून येणाºया एका  इनोव्हा वाहनावर धडकली.अपघातात रिक्षामधील अविनाश मोहन दालभगत  (२२) रा. देवळे, भास्कर कोंडाजी कोरडे (६५), शिवराम विठोबा सारुक्ते (४२), अर्जुन बहिरू सारुक्ते (४०), रा. उंबरकोन  हे चौघे जागीच ठार झाले. अपघातानंतर स्विफ्ट वाहनचालक फरार झाला  असून, इनोव्हा वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, अपघाताची माहीती समजताच उपविभागीय अधिकारी अतुल झेंडे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव व पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करीत मृतदेह घोटीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. घोटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title:  Four killed in a car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात