शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 03:18 PM2019-01-28T15:18:41+5:302019-01-28T15:55:26+5:30

पिडित मुलीची आई मुलीला संशयित नेटावटेच्या तावडीतून सोडविण्यासाठी धावली असता त्याने त्यांना चापटीने मारहाण करत दमदाटी व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Following the school girl's molestation | शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग

googlenewsNext
ठळक मुद्देघटनेनंतर संशयित फरार

नाशिक : शाळकरी मुलीचा शाळेत जाताना पाठलाग करत संशयिताने विनयभंग केल्याची गंभीर घटना शहरातील पंचवटी परिसरातील पेठरोड येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहुलवाडी पेठरोड पंचवटी येथून पिडित मुलगी शाळेत जात असताना संशयित अजय नेटावटे याने गल्लीतील लोकांना पिडित मुलगीसोबत प्रेमसंबंध असल्याचे खोटे सांगून पिडित मुलीचा उजवा हात पकडून स्वत:च्या दिशेने ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी पिडित मुलीची आई मुलीला संशयित नेटावटेच्या तावडीतून सोडविण्यासाठी धावली असता त्याने त्यांना चापटीने मारहाण करत दमदाटी व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुध्द विनयभंग व बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयित फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे महिला उपनिरिक्षक जाधव करीत आहेत.

Web Title: Following the school girl's molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.