बाणगावी गॅरेजला आग; सात दुचाकी भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:42 PM2022-05-16T22:42:37+5:302022-05-16T22:43:05+5:30

नांदगाव : तालुक्यातील बाणगाव येथे दुचाकी वाहने दुरुस्त करण्याच्या वर्कशॉपमध्ये आग लागून दुरुस्तीसाठी आलेल्या सात दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. स्थनिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

Fire at Bangavi garage; Seven bikes burnt | बाणगावी गॅरेजला आग; सात दुचाकी भस्मसात

बाणगाव बुद्रूक येथे बाबासाहेब गायकवाड यांच्या दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या दुकानाला आग लागून खाक झालेल्या दुचाकी.

Next
ठळक मुद्देसात लाखांचे नुकसान : संसारोपयोगी साहित्यही खाक

नांदगाव : तालुक्यातील बाणगाव येथे दुचाकी वाहने दुरुस्त करण्याच्या वर्कशॉपमध्ये आग लागून दुरुस्तीसाठी आलेल्या सात दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. स्थनिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
बाणगाव बुद्रूक येथे नांदगाव-येवला रोडलगत पत्र्याच्या गाळ्यात बाबासाहेब गायकवाड यांचे दुचाकी रिपेअरिंगचे दुकान असून सायंकाळी ५ वाजता दुचाकीचे साहित्य घेण्यासाठी ते नांदगावला गेले असता रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास सरपंच संगीता बागुल यांना त्यांच्या दुकानातून धूर निघत आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी परिसरातील नागरिकांना मोबाईलवर संपर्क करून मदतीसाठी बोलावून घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी असलेल्या ७ दुचाकी व स्पेअरपार्ट तसेच या गाळ्याशेजारच्या लगतच्या गाळ्यातील संसारोपयोगी साहित्य जळून अंदाजे ७ लाखांचे नुकसान झाले.

ग्रामसेवक युवराज निकम, सरपंच संगीता बागुल, उपसरपंच नारायण कवडे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम कवडे, रवींद्र कवडे, सोमनाथ भामरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. आग कशी लागली याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. माणिकपुंज येथील आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबातील होतकरू युवक बाबासाहेब गायकवाड यांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नुकताच दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला होता.

फोटो - १६बाणगाव फायर
 

Web Title: Fire at Bangavi garage; Seven bikes burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.