नाशिकच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला सिंगापूरमध्ये ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:00 PM2019-01-31T18:00:13+5:302019-01-31T18:00:33+5:30

प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला वंध्यत्व निवारण वैद्यकीय सेवा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल युनायटेड रिसर्च सर्व्हिस - आशिया वन तर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हॉस्पीटलचे संचालक वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी दि. 21 जानेवारी रोजी सिंगापूर येथे पुरस्कार स्विकारला.

'Fastest Grooving Brand in IVF' award in Progressive Fertility Center, Nashik, Singapore | नाशिकच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला सिंगापूरमध्ये ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्कार

नाशिकच्या प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला सिंगापूरमध्ये ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिकच्या वैद्यकीय सृष्टीत मानाचा तुरा

नाशिक : येथील प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरला वंध्यत्व निवारण वैद्यकीय सेवा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल युनायटेड रिसर्च सर्व्हिस - आशिया वन तर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हॉस्पीटलचे संचालक वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी दि. 21 जानेवारी रोजी सिंगापूर येथे पुरस्कार स्विकारला. या सन्मानाने ‘प्रोजेनेसिस’ सह नाशिकच्या वैद्यकीय सृष्टीत मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टर आणि प्रगत उपकरणे यांनी युक्त ‘प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर’ नि:संतान दाम्पत्यांसाठी वरदान ठरत आहे. ‘प्रोजेनेसिस’चे संचालक आणि प्रसिध्द वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर व डॉ. सोनाली मळगांवकर यांनी नव्या उपचार पध्दतीने मुल न होणार्‍या जोडप्यांच्या जीवनात आशेचा किरण फुलवला आहे. त्याची दखल घेत युनायटेड रिसर्च सर्व्हिस आशिया वन या दुबईस्थित संस्थेतर्फे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्काराने गौरविण्यात आले. वंध्यत्व निवारण, निदान आणि उपचार या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल यापूर्वीही 2016 मध्ये सिंगापूर येथील ‘बीईआरजी’ संस्थेतर्फे ‘बेस्ट हॉस्पीटल फॉर रिप्रोडक्टीव्ह मेडीसीन’ पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्काराने त्याचे कार्य अधिकच अधोरेखीत झाले आहे.
आयव्हीएफ (इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इनसेमिनेशन) ही वंध्यत्वावरील वैद्यकीय उपचार पध्दती असून त्याद्वारे अनेक जोडप्यांना अपत्यप्राप्ती शक्य झाली आहे. या पुरस्कारासाठी संस्थेने काही निकष ठेवले होते. त्यामध्ये वंध्यत्वाचे नवीन रूग्ण तसेच पूर्वी हॉस्पीटलमधून उपचार केलेल्या समाधानी रूग्णांची संख्या, हॉस्पीटलमध्ये आयव्हीएफचा सक्सेस रेट, हॉस्पीटलची सर्वंकष आणि सम्यक वृध्दी, प्रगती यासह  रूग्णांची काळजी असे अनेक निकष होते. या सर्व गोष्टींची पूर्तता करत डॉ. नरहरी मळगांवकर संचलित प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरने ‘फास्टेट ग्रोईंट ब्रँण्ड इन आयव्हीएफ’ पुरस्कारावर शिक्कामोर्तब केले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. नरहरी मळगांवकर व डॉ.सोनाली मळगांवकर यांनी आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले.

Web Title: 'Fastest Grooving Brand in IVF' award in Progressive Fertility Center, Nashik, Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.