‘ड्रंक-ड्राइव्ह’ रडारवर‘

By admin | Published: December 29, 2015 11:12 PM2015-12-29T23:12:06+5:302015-12-29T23:14:47+5:30

थर्टी फर्स्ट’: ‘टार्गेट’ पूर्ण करताना वाहतूक पोलिसांची दमछाक

'Drunk-drive' radar ' | ‘ड्रंक-ड्राइव्ह’ रडारवर‘

‘ड्रंक-ड्राइव्ह’ रडारवर‘

Next

 नाशिक : वर्षअखेर (थर्टी फर्स्ट)च्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांसह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदीमध्ये वाढ करण्यात आली असून, ‘ड्रंक-ड्राइव्ह’ पोलिसांच्या रडारवर असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे ‘टार्गेट’ पूर्ण करताना पोलिसांची दमछाक होत आहे.
दोन दिवसांवर थर्टी फर्स्ट येऊन ठेपल्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये वाहतूक शाखेने मद्य किंवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणाऱ्या अधिकाधिक लोकांवर कारवाई करण्याच्या मोहिमेला गती दिली आहे. त्यामुळे शहरातील विविध मोक्याच्या चौफुलींवर तसेच लिंक रोड, कॅनॉलरोड, रिंगरोड, दिंडोरी रोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, त्र्यंबकरोड, पुणे महामार्ग, तपोवनरोड आदि परिसरांत पोलिसांची गस्त वाढली आहे. ठिकठिकाणी संशयित दुचाकी-चारचाकी वाहने थांबवून तपासणी केली जात आहे. मद्य, गांजा, बियर आदि अंमली पदार्थांचे सेवन करून वाहने चालविताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे.
मद्यपी वाहनचालकांना कायदेशीररीत्या कारवाई करून तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात वाहतूक पोलीस घेऊन येत आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने नववर्षाचे स्वागत व जल्लोष करताना तरुणांनी मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन करू नये, या उद्देशाने वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Drunk-drive' radar '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.