फेरीवाला झोनच्या स्थगितीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:57 AM2019-02-21T00:57:02+5:302019-02-21T00:57:40+5:30

महापालिकेने शहर फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार केले असले तरी ते शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत मंजूर झालेले नाही. त्यामुळे फेरीवाला झोनला स्थगिती द्यावी तसेच रहदारी आणि ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणीच फेरीवाला क्षेत्र म्हणजे हॉकर्स झोन तयार करावेत, या मागणीसाठी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने बुधवारी (दि.२०) राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.

 Demonstrations for halting the hawker zone | फेरीवाला झोनच्या स्थगितीसाठी निदर्शने

फेरीवाला झोनच्या स्थगितीसाठी निदर्शने

googlenewsNext

नाशिक : महापालिकेने शहर फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार केले असले तरी ते शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत मंजूर झालेले नाही. त्यामुळे फेरीवाला झोनला स्थगिती द्यावी तसेच रहदारी आणि ग्राहकांची वर्दळ असलेल्या ठिकाणीच फेरीवाला क्षेत्र म्हणजे हॉकर्स झोन तयार करावेत, या मागणीसाठी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने बुधवारी (दि.२०) राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली.
महापालिकेने १५ मार्च २०१६ च्या महासभेत हॉकर्स झोन मंजूर केले आहेत, परंतु तो फेरी समितीच्या संमतीशिवाय हे क्षेत्र असून त्यामुळे त्याला तातडीने स्थगिती द्यावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय महापालिकेने शहर फेरीवाला समिती गठित केली आहे. परंतु या समितीच्या बैठका नियमित होत नाहीत. तसेच समितीत झालेले ठराव, इतिवृत्त सभासदांपर्यंत पोहोचत नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात असलेल्या सर्व हॉकर्स, टपरीधारक व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांची नव्याने बायोमेट्रिक नोंदणी करण्यात यावी, तसेच फेरीवाला क्षेत्रातील विक्रेत्यांकडून शुल्क वसुलीचा निर्णय शहर फेरीवाला समितीमध्ये चर्चा करून झाला पाहिजे. तोपर्यंत महापालिकेने अतिक्रमण हटाव कारवाई अंतर्गत जप्त केलेला माल परत द्यावा, अशा मागण्या युनियनने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. निदर्शनात सुनील संधानशिव, नीलेश कुसमोडे, जावेद शेख, जयाबाई पटेल, नारायण धामणे व चंद्रकला पारवे यांच्यासह अन्य फेरीवाला व्यावसायिक सहभागी झाले होते.

Web Title:  Demonstrations for halting the hawker zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.