नाशिकरोडला विविध ठिकाणी दत्त जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:40 AM2018-12-23T00:40:27+5:302018-12-23T00:40:58+5:30

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नाशिकरोड परिसरातील मंदिरांमध्ये व ठिकठिकाणी श्री दत्त महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

 Datta Jayanti Mahotsav at Nashik Road at different places | नाशिकरोडला विविध ठिकाणी दत्त जयंती महोत्सव

नाशिकरोडला विविध ठिकाणी दत्त जयंती महोत्सव

googlenewsNext

नाशिकरोड : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात नाशिकरोड परिसरातील मंदिरांमध्ये व ठिकठिकाणी श्री दत्त महाराज यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे भक्तीभावाने साजरी करण्यात आली. मंदिरांमध्ये दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.  श्री दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त दत्तमंदिररोड येथील घैसास दत्तमंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, देवळालीगाव आठवडे बाजारातील श्री दत्त महाराज मंदिर, मुक्तिधाम, लक्ष्मीनारायण मंदिर, पोलीस ठाण्यातील श्री हनुमान- दत्त महाराज मंदिर, बिटको महाविद्यालयामागील श्री एकमुखी दत्तमंदिर, विहितगाव श्री अण्णा गणपती नवग्रह सीद्धपीठम, शास्त्रीपथ श्री दत्तमंदिर, माडसांगवी येथील श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर, शिलापूर येथील श्री दत्त महाराज मंदिर आदी मंदिरांत श्री दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, प्रवचन झाले. देवळालीगाव आठवडे बाजारातील श्री दत्त महाराज मंदिरात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दुपारी हभप बाळनाथ सद्गीर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सायंकाळी परिसरातून श्री दत्त महाराज पालखी मिरवणूक काढून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. परिसरातील मंदिरांमध्ये सायंकाळी ६ वाजता श्री दत्त महाराज जन्मोत्सव धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सर्व श्री दत्त महाराज मंदिरात विद्युत रोषणाई करून श्री दत्त महाराजांचे भजन, गाणे स्पिकरवरून लावण्यात आले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रांत श्री दत्त जयंतीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून गुरूचरित्र पारायण वाचन, याग, होम-हवन सुरू आहे. श्री दत्त जयंतीनिमित्त शनिवारी गुरूचरित्रातील चौथा अध्याय वाचून दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मुक्तिधाम, कोठारी कन्या शाळेसमोर शिवम कॉम्प्लेक्स दत्तमंदिर सिग्नल जवळ, दुर्गा उद्यान भाजीबाजार आदी ठिकाणी श्री औदुंबराच्या झाडाखाली असलेल्या छोट्या मंदिरात परिसरातील व्यापारी, रहिवासी, भाविक यांनी मोठ्या उत्साहात श्री दत्त महाराज जयंती साजरी केली.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष
इंदिरानगर : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात आणि विविध धार्मिक कार्यक्र मांनी परिसरांतील दत्त मंदिरांत श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त मंदिर परिसरात फुले व फळांची दुकाने थाटली होती. तसेच सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. जिल्हा परिषद कॉलनीतील श्री गुरु देव दत्त मंदिर सेवा संस्थेच्या वतीने दत्त मंदिरात सकाळी ती दत्त पूजन अभिषेक पादुका पूजन आणि नवीन वस्त्र परिधान करण्यात आले. तसेच सकाळी साडेदहा वाजता जन्मोत्सवानिमित्त हभप कल्पेश महाराज यांचे कीर्तन झाले. भरत महाराज व भजनी मंडळाचा कार्यक्र म संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष भानुदास शौचे, बापू गोरे, रमाकांत अलई, गोपाळ गर्गे यांसह सदस्यांनी परिश्रम घेतले. परबनगर येथील दत्तकृपा सेवा समितीच्या वतीने दत्त मंदिरात सकाळी आठ वाजता ‘श्रीं’ची महापूजा शशिकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. श्री दत्त चैतन्य भजन सेवेचे वतीने भजनाचा कार्यक्र म,दत्तजन्म, पाळणा, आरती व त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच राजीव टाउनशिप येथील श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. परिसरातील मंदिरांत नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, सुप्रिया खोडे यांनी पूजन केले. परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. द्वारका येथील श्री संत गाडगे महाराज युवक मित्रमंडळाच्या वतीने दत्त मंदिरात सकाळी ‘श्रीं’ची महापूजा करण्यात आली. दत्तयाग, जन्मोत्सव यांसह विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. तसेच सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्र माठी मंगेश आहेर, कैलास देशमुख, अक्षय ताजणे, उपेंद्र पाटील, शुभम जाधव, तेजस विधाते आदी उपस्थित होेते.

Web Title:  Datta Jayanti Mahotsav at Nashik Road at different places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.