महागाईच्या दशावताराचे ‘दहन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:58 AM2017-10-01T00:58:44+5:302017-10-01T00:58:50+5:30

वाढत चाललेली महागाई आणि त्यामुळे मेटाकुटीस आलेली जनता हा धागा पकडत शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.३०) दुपारी महागाईच्या दशावतारी रावणाचे दहन करीत सरकारचा निषेध करण्यात आला.

Dashavatar's 'combustion' | महागाईच्या दशावताराचे ‘दहन’

महागाईच्या दशावताराचे ‘दहन’

googlenewsNext

नाशिक : वाढत चाललेली महागाई आणि त्यामुळे मेटाकुटीस आलेली जनता हा धागा पकडत शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.३०) दुपारी महागाईच्या दशावतारी रावणाचे दहन करीत सरकारचा निषेध करण्यात आला.  वाढते पेट्रोल- डिझेलचे दर, गॅसची कपात झालेली सबसीडी, तूप, साखर, रॉकेलचे वाढलेले दर, कांद्याचे घटलेले दर, यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वाढत्या महागाईमुळे तर जनता मेटाकुटीस आली आहे. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केली, मात्र ती फसवी आहे.  महागाईच्या या दहा तोंडांमुळे सर्व सामान्य जनता हवालदिल झाली असून, सरकारने त्वरित याबाबत आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. भालेकर मैदानावर दुपारी १ वाजता महागाईची दहातोंडे असलेल्या प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार योगेश घोलप, गटनेते विलास शिंदे, प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक संतोष गायकवाड, प्रवीण तिदमे, डी. जी. सूर्यवंशी, सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, श्याम साबळे, प्रशांत दिवे, सुवर्णा मटाले, श्यामला दीक्षित, शिवाजी भोर, संजय चव्हाण, रमेश धोेंगडे, उमेश चव्हाण, योगेश बेलदार, सुनील गोडसे, राजू वाकसरे आदी उपस्थित होते.

Web Title: Dashavatar's 'combustion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.